घरदेश-विदेशLive Update : हताश भाषण, टोमण्यांवर बोलू इच्छित नाही : देवेंद्र...

Live Update : हताश भाषण, टोमण्यांवर बोलू इच्छित नाही : देवेंद्र फडणवीस

Subscribe

उद्धव ठाकरेंच्या भाषणात नवीन काहीच नव्हते. अशा हताश भाषण, टोमण्यांवर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेवर दिली.


उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी येत्या १९ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश


 

- Advertisement -

महाराष्ट्र पोलीस बॅण्ड देशभरात अव्वल

पाईप बॅण्ड आणि ब्रास बॅण्डमध्ये प्रथम क्रमांक


मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयाला आग

रुग्णालयातील रुग्णांना उपचारासाठी दुस-या रुग्णालयात करण्यात आले दाखल


माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची आत्महत्या

चंद्रशेखर चाकूरकर यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी जवळच्या लोकांना केला “गुड बाय”चा मॅसेज


घाटकोपरमधून भाजप, शिवसेनेच्या आशिर्वाद यात्रेला सुरुवात

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातून काढली जाणार आशीर्वाद यात्रा

ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी आजपासून आशीर्वाद यात्रेला सुरुवात


विरोधी पक्षातील नेत्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

९ विरोधी पक्षातील नेत्यांचे मोदींना पत्र

शरद पवार, उद्धव ठाकरे, चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जीसह फारुख अब्दुल्ला यांची पत्रावर सही

राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांच्या कामात वाढता हस्तक्षेप आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर यामुळे लिहिले पंतप्रधानांना पत्र


उद्धव ठाकरेंची आज खेडमध्ये सभा

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंची पहिलीच सभा कोकणात

शिवसेनेच्या (शिंदे गट) रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात होणार सभा

संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष


मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

अटक करण्यात आलेला आरोपी उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती


बारावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे सहा गुण मिळणार

विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास सहा गुण मिळणार

सरसकट सर्वांना गुण देण्याची शिक्षक आणि पालकांची मागणी

बारावीच्या पहिल्याच इंग्रजी पेपरमध्ये एका प्रश्नामध्ये राज्य शिक्षण मंडळाकडून झाली होती चूक


उत्तरकाशी भागात रात्रीच्यावेळी जाणवले भूकंपाचे धक्के

रविवारी मध्यरात्री रात्री पाचवेळा जाणवले भूकंपाचे धक्के

उत्तर काशीमधील भटवाडी येथे असलेल्या सिरोर जंगलामध्ये भूकंपाचा केंद्रबिदू असल्याची माहिती


बांगलादेशातील चित्तगाँगच्या सीताकुंडा उपजिला परिसरातील एका ऑक्सिजन प्रकल्पामध्ये भीषण स्फोट

स्फोटात सहा जणांचा मृत्यू तर ३० पेक्षा अधिक लोक जखमी

स्फोटामुळे घटनास्थळापासून असणाऱ्या दोन चौरस किमीच्या परिसरातील इमारतींना बसले हादरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -