घरअर्थजगतप्रधानमंत्री जन धन योजनेची 8 वर्षे, 46.30 कोटींपेक्षा अधिक लाभधारक

प्रधानमंत्री जन धन योजनेची 8 वर्षे, 46.30 कोटींपेक्षा अधिक लाभधारक

Subscribe

नवी दिल्ली : प्रधानमंत्री जन धन योजनेला आज 8 वर्षे पूर्ण झाली. या योजनेद्वारे आतापर्यंत 46.25 कोटींपेक्षा अधिक लाभधारक बँकींग व्यवस्थेशी जोडले गेले असून एकूण शिल्लक ठेवी 1,73,954 कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात प्रधानमंत्री जन धन योजनेची घोषणा केली होती. त्याच वर्षी 28 ऑगस्ट रोजी या योजनेचा त्यांच्या हस्ते प्रत्यक्षात प्रारंभ झाला, त्यावेळी ही घटना म्हणजे गरिबांची एका दुष्टचक्रातून सुटका करण्याचा उत्सव असे वर्णन केले होते. एकूण जनधन खात्यांपैकी 66.8 टक्के खाती ही ग्रामीण आणि निमशहरी भागांमधील आहेत. तसेच एकूण खातेदारांपैकी 56 टक्के महिला खातेधारक आहेत. यामुळे या यशाची व्याप्ती अधिकच मोठी आहे, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.

बँकिंग व्यवस्थेतल्या कोणत्याही स्वरुपातल्या सेवांपासून दूर असलेल्यांना बँकीग व्यवस्थेत आणणे, कोणत्याही सुरक्षेपासून दूर असलेल्यांना सुरक्षा प्रदान करणे आणि कोणत्याही आर्थिक सहकार्यपासून दूर असलेल्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे हे प्रधानमंत्री जन धन योजनेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रधानमंत्री जनधन योजना (पीएमजेडीवाय) ही केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आर्थिक समावेशनाच्या दिशेने सर्वात दूरगामी परिणाम साधणाऱ्या उपायजोनांपैकी एक आहे. थेट लाभ हस्तांतरण असो, कोविड-19च्या काळात दिलेली आर्थिक मदत असो, प्रधानमंत्री-किसान योजना असो, मनरेगा अंतर्गत दिला जाणारा वाढीव मोबदला असो तसेच जीवन आणि आरोग्य विमा संरक्षण असो, या सगळ्यासाठीची पहिली पायरी म्हणजे प्रत्येक प्रौढ व्यक्तीला बँक खाते सुरू करून देणे आणि प्रधानमंत्री जन धन योजनेने हे काम जवळपास पूर्णत्वाला नेले आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटले आहे.

मार्च 2014 ते मार्च 2020 उघडण्यात आलेल्या प्रत्येक 2 खात्यांपैकी एक खाते हे प्रधानमंत्री जन धन योजनेचे खाते होते. देशव्यापी लॉकडाऊन सुरु असतानाच्या 10 दिवसांच्या काळातच सुमारे 20 कोटींहून अधिक महिलांनी आपले प्रधानमंत्री जन धन खाते सुरू केले होते, याच खात्यांमध्ये नंतर त्यांच्यासाठी सानुग्रह अनुदान जमा केले गेले. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यांमधली शिल्लक ठेव सुमारे 7.60 पटीने वाढली आहे, त्यासोबत खात्यांची एकूण संख्याही 2.58 पटीने वाढली आहे. या योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यांमधली शिल्लक ठेव 1,73,954 कोटी रुपये इतकी आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -