Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर

Subscribe

3/6/2023 22:28:54  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर 


3/6/2023 22:26:12 सागर बंगल्यावरील भाजपची बैठक संपली 


- Advertisement -

3/6/2023 19:21:59  मुंबईतील भाजप आमदार, खासदारांची आज सागर बंगल्यावर बैठक 


3/6/2023 17:33:56  शिंदे सरकारने केल्या आणखी पाच जणांच्या बदल्या

- Advertisement -

अनिल डिग्गीकर सिडकोचे उपाध्यक्ष

मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजिक बांधकाम विभाग खाते


3/6/2023 17:20:43 दोषींवर योग्य ती कारवाई करणार – नरेंद्र मोदी

मोदींकडून जखमींच्या प्रकृतीची विचारपूस


3/6/2023 17:1:58 पुण्यातील बैठकीला शरद पवारांची उपस्थिती

ओडिशातील अपघाताची चौकशी व्हावी – शरद पवार


3/6/2023 16:48:13  डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती


3/6/2023 15:59:52 डॉ. तात्याराव लहानेंचा राजीनामा सरकारकडून मंजूर

जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टारांच्या आरोपानंतर दिला होता राजीनामा

डॉ. लहानेंच्या जागी तात्काळ नवी नियुक्ती करण्याचे आदेश


3/6/2023 15:45:47 पंतप्रधान नरेंद्र मोदी बालासोरमध्ये दाखल

ट्रेन अपघाताची करणार पाहणी

कटकच्या रुग्णालयात मोदी जखमींची भेट घेणार


3/6/2023 12:49:4 पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशा अपघाताची पाहणी करणार


3/6/2023 12:44:31 पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर दाखल

गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनुमित्त आज गोपीनाथ गडावर कार्यक्रम


3/6/2023 12:43:5 लाचखोर सुनीता धनगरांकडे सापडले 85 लाख रुपये

सुनीता यांच्या घरी तीस तोळे सो, तर त्यांच्या घराची किंमत दीड कोटी

धनगरांच्या नावावर दोन आलिशान प्लॅट आणि जागा आहे


3/6/2023 11:33:50 बालासोर भीषण अपघाताच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू


3/6/2023 10:52:11 दादरमध्ये शिवसेनेचं (शिंदे गट) राऊतांविरोधात जोडे मारो आंदोलन सुरू

सदा सरवणकरांच्या उपस्थित आंदोलन सुरू


3/6/2023 9:20:45 एकनाथ खडसे, धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर एकत्र

गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनुमित्त आज गोपीनाथ गडावर कार्यक्रम

एकनाथ खडसे, धनंजय मुंडे, रोहिणी खडसे यांनी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे स्व. मुंडे साहेबांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले


3/6/2023 8:37:38 ओडिशा रेल्वे अपघातात मृतांचा आकडा 288 वर 


3/6/2023 8:35:37 भाजपा नेत्या पंकजा मुंडे आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट घेणार

पंकजा मुंडे भाजपामध्ये नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे

खडसे-मुंडे भेटीत राजकीय चर्चा होणार असल्याचे समजते, पण भेटीचं कारण गुलदस्त्यात


3/6/2023 7:52:27 ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

काही दिवसापूर्वी संदल मिरवणुकीत काही तरुणांनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे वाद झाला होता

संजय राऊत यांनी मिरवणुकीत धूप दाखवण्याची परंपरा असल्याचे वक्तव्य केले होते

संजय राऊत यांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यामुळे पुन्हा त्या वादग्रस्त प्रकरणाला उजाळा मिळण्याची शक्यता


3/6/2023 7:44:46 रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ओडिशा दुर्घटनास्थळी दाखल

अपघाताची चौकशी करण्यासाठी उच्च समिती गठीत करणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले

3/6/2023 7:24:34 ओडिशा अपघातात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू

900 प्रवासी जखमी, तर आतापर्यंत 207 मृतदेह बाहेर काढण्यात आले 
रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरूच
या अपघातातील मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी मदत जाहीर
या अपघातात मृत्यांच्या वारसांना 10 लाख रुपये
गंभीर जखमींसाठी २ लाख आणि किरकोळ जखमींसाठी ५० हजार रुपये मदत जाहीर
पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त
ओडिशा अपघातानंतर आज होणारा मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा लोकार्पण कार्यक्रम रद्द

3/6/2023 7:24:34 मुंबईच्या काही भागात सोमवारी पाणी पुरवठा बंद

जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रुझ, विलेपार्ले या भागात पाणी पुरवठा बंद

या भागातील रहिवाशांना रविवारी पाणी साठवून ठेवण्याचे पालिकेचे आवाहन

दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा राहणार बंद

- Advertisment -