बजेटपेक्षाही जास्त किमतीला विकले गेले शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचे हक्क

शाहरुख खान बऱ्याच दिवसांनी पडद्यावर परतत असून त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान जावं या चित्रपटाचे ओटीटी आणि सॅटेलाईटचे राइट्स मोठ्या किमतीत विकले गेले अशी चर्चा सुद्धा आहे.

shahrukh khan

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘जवान’ चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. 2023 मध्ये शाहरुख खानचे 3 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यापैकी एकामध्ये तो अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली हे जवान चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरुख खान एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. शाहरुख खान बऱ्याच दिवसांनी पडद्यावर परतत असून त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.दरम्यान जावं या चित्रपटाचे ओटीटी आणि सॅटेलाईटचे राइट्स मोठ्या किमतीत विकले गेले अशी चर्चा सुद्धा आहे.

हे ही वाचा – ‘ब्रह्मास्त्र’ने रचला इतिहास, तिसऱ्याच आठवड्यात केली बक्कळ कमाई

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाच्या एकूण बजेटपेक्षा जास्त पैसे त्याचे ओटीटी आणि सॅटेलाईटचे हक्क विकून कमावले जातील. चित्रपटाचे सॅटेलाइट अधिकार झी टी.व्ही ने विकत घेतले आहेत, तर जवान चित्रपटाचे OTT अधिकार Netflix कडे आहेत. LetsCinema या ट्विटर हँडलनुसार, ‘जवान’ चित्रपटाचे सॅटेलाइट आणि OTT हक्क 250 कोटींना विकले गेले आहेत. ट्विटमध्ये लिहिल्यावर, ‘शाहरुख खानचा बिग बजेट अॅक्शन एंटरटेनर चित्रपट आहे. एटली दिग्दर्शित जवान चित्रपट झी टीव्हीने चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क विकत घेतले आहेत आणि नेटफ्लिक्सने 250 कोटींना डिजिटल अधिकारांचे हक्क विकत घेतले आहेत’.

हे ही वाचा – नागा चैतन्यला विसरण्यासाठी समंथा रूथ प्रभू करतेय दुसरं लग्न

एकीकडे बॉलिवूडच्या आमिर खानसह बड्या स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडत आहेत, त्यांची विशेष उल्लेखनीय कामगिरी सुद्धा नाही. तर दुसरीकडे शाहरुख खानची मात्र त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच या चित्रपटाचे हक्क मोठ्या किमतीत विकले गेले आहेत. या चित्रपटात शाहरुख खान आणि ऍटली पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात शाहरुखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी भाषेव्यतिरिक्त व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही जवान चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा – अरुण गोविल आणि दीपिका पुन्हा एकदा राम-सीतेच्या भूमिकेत