घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य : रविवार १८ फेब्रुवारी ते शनिवार २४ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : रविवार १८ फेब्रुवारी ते शनिवार २४ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष ः- या सप्ताहात कुंभेत शुक्र, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू धनुमध्ये केतू प्रवेश करीत आहे. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढेल. रागावर ताबा ठेवा. संयम बाळगा. शांततेत काम करा. धंद्यात नवे काम मिळेल. आधुनिक यंत्रावर खर्च होण्याची शक्यता आहे. संसारात वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. घरातील कामात सर्वांचे सहाय्य मिळेल. स्वतःच्या डोळ्यांची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तडजोडीचे धोरण ठेवा. व्यसनात धुंद झाल्याने चूक घडू शकते. कोणतेही व्यसन करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. ओळखीचे लोक आश्वासन देतील. संशोधनाच्या कामात यश मिळेल. प्रवासात सावध राहा. परीक्षेला जाताना गरजेच्या वस्तू न विसरता घ्या. जिद्द ठेवा. शुभ दि. १८, २२

वृषभ ः- या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतु या ग्रहांचा बदल होत आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात जम बसवा. समस्या सोडवा. मोठे काम मिळवता येईल. थकबाकी मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना महत्त्व देऊन त्या पूर्ण करा. दौर्‍यात यश येईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. मुलांची चिंता कमी होऊ शकते. जीवनसाथीची प्रगती होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. ओळख पक्की करून ठेवा. त्याचाच उपयोग होईल. संशोधनाचे काम व्यवस्थित करता येईल. वरिष्ठ खूश होतील याकडे लक्ष ठेवा. सप्ताहाच्या शेवटी प्रवासात घाई करू नका. परीक्षेसाठी चांगला प्रयत्न करा. रात्री जास्त जागरण करू नका. शुभ दि. १९, २३

- Advertisement -

मिथुन ः या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, धनुत केतू येत आहे. धंद्यात जम बसेल. थोरा-मोठ्यांच्या ओळखीतून तुमचा उद्योग मोठे स्वरूप घेईल. मागील येणे वसूल करता येईल. नवे काम मिळेल. नोकरीत बढती, बदलीचा योग येईल. राजकीय-सामाजिक अभ्यास करून जनहितासाठी योजना बनवा. प्रमाणिकपणे लोकांची कामे करा. प्रगती करण्याची संधी कला-क्रीडा क्षेत्रात मिळेल. नवीन ओळखीमुळे उत्साह वाढेल. वाटाघाटीत नवा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कोर्ट केस जिंकता येईल, अशी वेळ येईल. उतावळेपणा करू नका. संशोधनाच्या कामात बुद्धी, युक्तीचा उपयोग होईल. वरिष्ठांना तुमचा प्रभाव दिसेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी. शुभ दि. २०, २४

कर्क ः- या सप्ताहात ग्रहांचा मोठा बदल म्हणजे कुंभेत शुक्र, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू येत आहे. या राशीत ते उच्चीचे फल देतात. धंद्यात सावधगिरीने आर्थिक व्यवहार करा. मोठे काम मिळवण्यात फसगत होऊ शकते. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. नोकरीत सप्ताहाच्या सुरुवातीलाच बदल करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा टिकून राहील. बोलताना काळजी घ्या. क्षुल्लक शत्रूसुद्धा भारी पडतो. घरगुती वाटाघाटीत मतभेद होतील. जीवनसाथी, मुले यांची नाराजी होऊ शकते. त्यांची चिंता कराल. अनाठाई खर्च संभवतो. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थी वर्गाने परीक्षेची जास्त काळजी करू नये. अभ्यास नीट करावा. शुभ दि. १८, २१

- Advertisement -

सिंह ः- या सप्ताहात कुंभेत शुक्र, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, धनुत केतू येत आहे. धंदा वाढेल. अरेरावी करून चालणार नाही. कुणाचाही दबाव आणू नका. काम करून घ्या. मागील येणे वसूल होऊ शकेल. सप्ताहाच्या सुरुवातीला राजकीय-सामाजिक कार्यात तणाव होईल. वरिष्ठ तुमच्यावर आरोप टाकतील. परिस्थिती सावरून घेण्याची संधी शोधावी लागेल. सहकारी मदत करतील. संसारातील समस्या सोडवता येईल. घरातील वृद्ध व्यक्तीसाठी चिंता कराल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. स्पर्धेत टिकणे सोपे नाही. संशोधनाच्या कामात यश समोर दिसेल. परंतु नवीन धोरण ठरविणे कठीण वाटेल. विद्यार्थी वर्गाने वाकडी वाट न धरता परीक्षेचा सर्व अभ्यास करावा. शुभ दि.१९, २२

कन्या ः- या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू येत आहे. कामात सहकारी विनाकारण त्रास देतील. रागावर ताबा ठेवा. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळेल. मैत्रीत वाढ होईल. व्यसनामुळे बोलण्यातून गैरसमज होईल. घरगुती कामे वाढतील. वाटाघाटीत नाराजी होईल. जीवनसाथीच्या बरोबर वाद वाढेल. सावधपणे बोला. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव टिकवता येईल. सरकारी, नेता यांच्या बाजू ऐकून घ्या. घाईत निर्णय घेऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. वाहनाचा खर्च निघेल. संशोधनाच्या कामात स्वतः कष्ट घ्या. यश मिळेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी चांगली तयारी करावी. शुभ दि. २०, २३

तूळः या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू येत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धंद्यात मोठे काम मिळू शकेल. नोकरीत सप्ताहाच्या शेवटी तणाव होईल. रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. घरगुती कामे वाढतील. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांच्या मर्जीनुसार काम करावे लागेल. दबाव राहील. कला-क्रीडा क्षेत्रात जिद्द ठेवा. प्रसिद्धीसाठी कदाचित विलंब होईल. संशोधनाच्या कामात धावपळ होईल. हाती आलेला पुरावा कमी पडू शकतो. सहकारी, मित्र यांना कामात सांभाळून घ्यावे. कामात वरिष्ठांची नाराजी दूर करा. दुसर्‍याच्या भरवशावर राहू नका. विद्यार्थी वर्गाने नम्रता ठेवावी. प्रवासात नवीन ओळखी होतील. शुभ दि. २१, २४

वृश्चिक ः या सप्ताहात कुंभेत शुक्र, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू येत आहे. साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. धंद्यात कामे मिळाली तरी कामगारांची कमी होण्याची शक्यता आहे. तडजोड करावी लागेल. गोडी गुलाबीने काम टिकवा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. विरोधक त्यांच्या पद्धतीने तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. मैत्रीत क्षुल्लक गैरसमज सप्ताहाच्या शेवटी होईल. संसारात खर्च होईल. प्रवासात अडचणी येतील. धावपळ होईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. महत्त्वाची कोणतीही कामे करून घ्या. सहकारी मदत करतील ती घ्या. मोठेपणा करू नका. विद्यार्थी वर्गाने आळस न करता अभ्यासात लक्ष द्यावे. शुभ दि. १८, २०

धनु ः- या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र, वृषभ राशीत मंगळ, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू असा बदल या सप्ताहात होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात काम मिळवण्यासाठी धावपळ करावी लागेल. थकबाकी मिळवणे त्रासदायक ठरेल. नोकरीत बदल करण्याची संधी येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे कौतुक होईल. गुप्त शत्रू अडचणी निर्माण करतील. प्रवासात सावध राहा. काही प्रश्न तटस्थ राहून सोडवा. घरातील व्यक्तींची मदत होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवे काम मिळवता येईल. आश्वासन मिळेल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी चांगली करावी. अभ्यासाकडे लक्ष द्यावे. उत्तम यश मिळेल. शुभ दि. १९, २१

मकर ः- या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू यांचे राशांतर होत आहे. साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. धंद्यातील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न करा. नवीन गुंतवणूक करणारे मिळतील. विचारांचा गुंता होईल. व्यसनाने नुकसान होईल. कोणत्याच व्यसनाच्या नादी लागू नका. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल असे कार्यनियोजन करा. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची मोठी संधी मिळेल. संसारात सुखद समाचार मिळेल. कोर्टाच्या कामात दिशा मिळेल. तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. सावध राहा. संशोधनाच्या कामात यश येईल. विद्यार्थ्यांना प्रगतीचा मार्ग मिळेल. शुभ दि. २०, २२

कुंभ ः- या सप्ताहात तुमच्याच राशीत शुक्र, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू येत आहे. नोकरीत प्रतिष्ठा मिळेल. परंतु कामाचा व्याप वाढेल. नोकरीत प्रमोशन होईल. तुमच्यावर मोठी जबाबदारी टाकली जाईल. धावपळ होईल. प्रकृतीकडे लक्ष द्या. सहकारी मदत करतील. प्रवासाचा बेत आखाल. वाहन जपून चालवा. निष्कारण गुप्त कारवायांचा त्रास होईल. तात्पुरते सर्व असेल. काळजी करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे विचार पटले तरी तुम्हाला डावलले जाईल. तुमचे कार्य चालूच ठेवा. तुमच्या कामाच्या व्यापातून इतर कामे राहू शकतात. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संशोधनाच्या कामात दिशाभूल होईल. शुभ दि. २१, २३

मीन ः- कुंभ राशीत शुक्र, वृषभेत मंगळ, मिथुनेत राहू, धनुमध्ये केतू येत आहे. धंद्यात अस्थिर व्हाल. चूक होईल. सावध राहा. मैत्रीत दगा संभवतो. प्रवासात घाई नको. उधारीवर जास्त माल देऊ नका. घरात तणाव, मतभेद वाढू शकतो. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. जवळचे लोक द्वेषाने पाहतील. काड्या घालण्याचा प्रयत्न करतील. कला-क्रीडा क्षेत्रात मैत्रीत फसगत संभवते. सप्ताहाच्या शेवटी शुभ समाचार मिळेल. व्यसनाने समस्या येऊ शकते. कोणतेही व्यसन करू नका. संशोधनाच्या कामात तुमच्या कामाचे श्रेय दुसरा घेण्याची शक्यता आहे. नम्रपणे बोला. नाते तुटू शकते. विद्यार्थ्यांनी परीक्षेची पूर्ण तयारी करावी. शुभ दि. २२, २४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -