घरताज्या घडामोडीकित्येक दिवस मंत्रिमंडळात असताना 'त्या' दोघांनी प्रकल्पाबाबत प्रयत्न करायला हवे होते, अजित...

कित्येक दिवस मंत्रिमंडळात असताना ‘त्या’ दोघांनी प्रकल्पाबाबत प्रयत्न करायला हवे होते, अजित पवारांचा टोला

Subscribe

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर एकमेकांना जबाबदार ठरवलं जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. कित्येक दिवस मंत्रीमंडळात असताना त्या दोघांनी प्रकल्पाबाबत प्रयत्न करायला हवे होते, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

आता तीन महिने झाले यांना मुख्यमंत्री होऊन. कंपनीचं ते ट्वीट आल्यानंतर हे सगळं समजलं. आज ९० दिवस काही कमी नाहीयेत. स्वत: प्रयत्न करायचे नाहीत. कित्येक दिवस तर ते दोघंच मंत्रीमंडळात होते. त्यावेळी मोठ्या प्रकल्पांबाबत प्रयत्न करायला हवे होते, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

ते तर म्हणत होते की आम्ही दोघं खंबीर आहोत. अजूनही पालकमंत्री नेमलेले नाहीत. ते काय सांगतायत? तीन तीन महिने तुम्हाला पालकमंत्री नेमता येत नाहीत. आम्ही काही बोललो की हे असंच बोलतात वगैरे सांगतात. आम्ही वस्तुस्थितीला धरून बोलतो, असं अजित पवार म्हणाले.

राज्याच्या हिताचे आणि पर्यावरणाला धक्का न पोहोचवणारे प्रकल्प त्यांनी आणावेत. त्यासाठी आमची संमती आहे. राज्याच्या हिताचे प्रकल्प आणल्यास आम्ही सरकारला सहकार्य करू, असंही पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : राऊत हे राजकीय व्यक्तिमत्व असल्याने त्याचा प्रभाव तपासावर पडू शकतो; ईडी वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -