घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरRaosaheb Danve : अंबादास दानवे पूर्वाश्रमीचे भाजपाचे, त्यामुळे... - रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : अंबादास दानवे पूर्वाश्रमीचे भाजपाचे, त्यामुळे… – रावसाहेब दानवे

Subscribe

भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अंबादास दानवे हे पूर्वाश्रमीचे भाजपाचेच आहेत, असे म्हणत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा करण्यात येत आहे. त्यामुळे ते लवकरच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून भाजपा किंवा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. याचबाबत आता भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अंबादास दानवे हे पूर्वाश्रमीचे भाजपाचेच आहेत, असे म्हणत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत. (Ambadas Danve belongs to BJP – Raosaheb Danve)

हेही वाचा… Thackeray group : मोदी प्रेरणेने सुरू झालेला खेळ, वकिलांच्या पत्रावरून ठाकरे गटाची टीका

- Advertisement -

आज (ता. 30 मार्च) ठाकरे गटातील एक मोठा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा नेता अंबादास दानवे असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे याचबाबत आता रावसाहेब दानवे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अंबादास दानवे पूर्वश्रमीचे भाजपाचे नेते आहेत. ते आज आमच्यासोबत नाहीत. ते त्यांच्या पक्षाचे काम करतात. आमचा त्यांच्याशी थेट संपर्क झालेला नाही. मात्र, संभाजीनगर जागा आम्हाला मिळावी किंवा मित्र पक्षाला जरी मिळाली तर ती जिंकण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत, असे सूचक वक्तव्य रावसाहेब यांनी केल्याने याबबात अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत.

तसेच, ठाकरे गटाला एक धक्का नाही तर धक्क्यावर धक्के, धक्क्यावर धक्के नक्कीच बसतील. पण 4 जूनला मोठा धक्का बसेल, असा दावा रावसाहेब दानवे यांच्याकडून करण्याक आवा आहे. निवडणूक आहे, निवडणुकीत सर्वच गोष्टी कराव्या लागतात, याचा अर्थ हा नाही की आम्ही आत्मविश्वास गमावला. जर कोणाला घेऊन आम्ही आत्मविश्वास गमावला असे म्हणत असतील तर ते चुकीचे आहे, असेही दानवे यांच्याकडून ठामपणे सांगण्यात आले.

- Advertisement -

मविआ समविचारी नाही…

यावेळी रावसाहेब दानवे यांना महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. याबाबतही ते मत व्यक्त करत म्हणाले की, महाविकास आघाडी समविचारी नाही. तीन पक्षाचे तीन तोंड आहेत. जिंकल्यावर देखील एक राहणार नाही, यांचा वाद जुना आहे. आजही आमची संभाजीनगरची सीट वन वेच आहे. त्यामुळे ती जाहा सेफ करण्यासाठी आणखी कोणी मदतीला धावून येणार असेल तर, त्याला आम्ही तयार आहोत, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -