घरदेश-विदेशThackeray group : ...म्हणून न्यायाचा तराजू अस्थिर, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर प्रहार

Thackeray group : …म्हणून न्यायाचा तराजू अस्थिर, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर प्रहार

Subscribe

मुंबई : काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा 600 वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आला आहे. पण आज न्यायालयातील सर्वच प्रकारच्या नेमणुकांत राजकीय हस्तक्षेप आणि संघाची ढवळाढवळ आहे. सरकारी वकील नेमतानाही हा हस्तक्षेप होतो. त्यामुळे न्यायाचा तराजू अस्थिर आहे. 600 वकिलांचा ‘संघ’ त्यावर गप्पच आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – Thackeray group : मोदी प्रेरणेने सुरू झालेला खेळ, वकिलांच्या पत्रावरून ठाकरे गटाची टीका

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाबाहेर लोकशाही रक्षणासाठी शेकडो वकील ‘ईव्हीएम’विरुद्ध आंदोलन करीत आहेत. 600 वकिलांचा संघ या आंदोलनाची दखल घ्यायला तयार नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा हैदोस चालला आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणे न्यायप्रविष्ट असलेले लोक मोदी पक्षात जातात आणि त्यांची प्रकरणे लगेच बंद होतात, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केला आहे.

न्यायालयांवर दबाव आणण्यासाठीच हे सर्व घडवले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे प्रकरणात निष्पक्ष आणि राष्ट्रहिताचा निर्णय दिल्यामुळे मोदी सरकार पुरते नागडे झाले आहे. तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाचे निष्पक्ष न्यायमूर्ती मोदी सरकार आणि त्यांच्या चमचे मंडळाच्या डोळ्यांत खुपत होते. निवडणूक रोखे हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. घोटाळा करणारे सरकार आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या श्रीमंतांनी हे पत्र लिहिले आहे, अशी टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Electoral Bond : मतदानापर्यंत ही गोष्ट कुणीही विसरू नये, अन्यथा…, रोहित पवारांनी मतदारांना केले अलर्ट

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे प्रकरणात यातील अनेक श्रीमंत वकिलांची बोलतीच बंद केली आणि लोकांसमोर सत्य येऊ दिले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दबाव आणि धमक्यांना भीक न घालता हा राष्ट्रहिताचा निकाल दिला. हे वकील संघास आवडले नसावे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार सुरू आहे आणि त्या कामी दबाव, धमक्यांचे सत्र चालले आहे. 600 वकील संघातील कायदेपंडित याप्रकरणी घटनाबाह्य सरकारच्या बाजूने उभे राहिले. अशांना देशाच्या न्यायपालिकेतील धमक्यांची चिंता वाटत आहे. जे धमक्या देत आहेत आणि राज्यघटना खतम करीत आहेत त्यांच्या बाजूने 600 वकिलांचा संघ उभा राहिला तर इतिहास आणि राज्यघटना त्यांना माफ करणार नाही, असा इशाराही ठाकरे गटाने दिला आहे.

हेही वाचा – Raosaheb Danve : अंबादास दानवे पूर्वाश्रमीचे भाजपाचे, त्यामुळे… – रावसाहेब दानवे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -