Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी महाराष्ट्रात अवकाळी सरकार बसलंय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्रात अवकाळी सरकार बसलंय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Subscribe

राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस, गारपीट आणि जोराच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांते नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. याच पार्श्वभूमी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. (An untimely government is sitting in Maharashtra Attack of Aditya Thackeray)

“राज्यात सध्या अवकाळी सरकार बसले आहे. राज्यात अवकाळी पाऊस झाला तरी, अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. शेतकरी मदतीपासून वंचित आहे. मागील सरकारच्या काळात शेतकऱ्यांना जाहीप केलेली सर्व मदत मिळाली. याबाबत मी शेतकऱ्यांशी बातचीत केली असता, त्यांनीही मदत मिळाल्याचे सांगितले”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे काय बोलणार याला जास्त महत्त्व

छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील वज्रमूठ सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाविकास आघाडीची मुंबईत आज तिसरी वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेला आज विशेष महत्त्व आहे. कारण आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस आहे. त्यामुळे या सभेत संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे फक्त उद्धव ठाकरे यांचंच भाषण नाही तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचंही भाषण महत्त्वाचं आहे.

आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

– गेल्या ९-१० महिन्यात महाराष्ट्र अंधकारात गेला आहे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुवर्णकाळाकडे घेऊन जायचे आहे.
– महाविकास आघाडीच्या काळात साडे सहा लाख कोटींची गुतवणूक महाराष्ट्रात आणली गेली आहे.
– सध्याचं सरकार हे बिल्डर आणि कंत्राटदारांचे सरकार आहे. यात एकही मुंबईकर नाही.
– महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. आजही शेतकरी सांगतात, आम्हाला सरकारची मदत मिळाली.
– आता अवकाळी सरकार बसलं आहे. त्यांना अवकाळी पावसाची पर्वा नाही. शेतकऱ्यांच्या दुःखांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही.
– महिलांबाबत अपशब्द वापरणारे आजही सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत आहेत.
– महाराष्ट्रात मुख्यमंत्री नसल्यासारखा कारभार चालला आहे. हे राज्य अंधकारात गेले आहे. त्याला अंधकारातून बाहेर काढायचे आहे.
– फॉक्सकॉनसह अनेक उद्योग महाराष्ट्रातून बाहेर गेले. बाहेर म्हणजे गुजरातमध्ये गेले आहेत
– गुजरातला सध्या दोन मुख्यमंत्री आहेत, एक तिकडचा आणि एक आपल्याकडचा.
– मुंबईत शिवसेनेची सत्ता आली तेव्हा मुंबई महापालिकेचा तुटीचा अर्थसंकल्प होता.
-आज त्याच मुंबई महापालिकेकडे ९० हजार कोटींच्या ठेवी आहेत.

- Advertisment -