घरताज्या घडामोडी'त्यांचा खून केला तुम्ही...', खारघर दुर्घटनेवरून जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

‘त्यांचा खून केला तुम्ही…’, खारघर दुर्घटनेवरून जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

Subscribe

‘महाराष्ट्राला दाखवायला त्यांनी एक तमाशा तयार केला होता की आमच्या मागे किती लोक आहेत. पण ते तुमच्यासाठी नव्हते आले ते आप्पासाहेबांसाठी आले होते. पण तुमच्या महत्त्वाकांशासाठी तुम्ही त्यांचा खून केला. ही राक्षसी मुघलाई वागणं आहे’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमा दरम्यान घडलेल्या खारघर दुर्घटनेवरून शिंदे-फडणवीस सरकारला पुन्हा एकदा घेरले. (NCP Jitendra Awhad Slams Shinde Fadnavis Government On Kharghar Incident)

नेमके काय म्हणाले आव्हाड?

- Advertisement -

“आता हवा खेळती आहे. वेळ योग्य निवडलेली आहे. परिपक्व नेतृत्व हे लोकांची काळजी घेणारे असते. माझ्या कार्यकर्त्याला कोणताही त्रास होता कामा नये, असे नियोजन परिपक्व कार्यकर्ता करतो. पण त्या दिवशी त्यांनी जी सभा घेतली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सभा घेतली. वेळ 12 वाजता. म्हणजे कडकडीत उन वरती आणि पाणी प्यायला जायचं असेल तर, दीड किलोमीटर लांब चालत जावं लागत होतं”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“मला मृत्यूचा आकडा माहीत नाही. पण मृत्यू झालेल्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या आणि जेव्हा जखमा दिसतात तेव्हा तिकडे चेंगराचेगरी झाली हे स्पष्ट होते. आजपर्यंत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या घरी एकही मंत्री गेलेला नाही. संवेदना नाही. महाराष्ट्राला दाखवायला त्यांनी एक तमाशा तयार केला होता की आमच्या मागे किती लोक आहेत. पण ते तुमच्यासाठी नव्हते आले ते आप्पासाहेबांसाठी आले होते. पण तुमच्या महत्त्वाकांशासाठी तुम्ही त्यांचा खून केला. ही राक्षसी मुघलाई वागणं आहे”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाडांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :

– मुंबई वाढवली ती येथील कामगारांनी. कामगारांनी आपला घाम गाळून ही मुंबई मोठी केली आहे.
– दिल्लीत बसलेल्यांना मुंबईचे पाय कापायचे आहे. पण दिल्लीत बसलेल्यांना सर्वात पहिले आव्हान दिले आहे ते याच महाराष्ट्राने.
– लोकशाहीत लोकांची मनं जिंकायची असतात. मात्र सध्या लोकांवर दडपशाही करुन त्यांना आपल्यासोबत घेण्याची बळजबरी सुरु आहे.
– अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण देण्यासाठी भर दुपारची वेळ निवडण्यात आली.
– बारसू, सोलगावचा प्रश्नाकडे हे सरकार ऐकून घ्यायलाच तयार नाही.
– २०५ लोकांना परवा अटक करण्यात आल्या आहेत
– आता कोणाविरोधात काही बोलायचेच नाही, अशी परिस्थिती आहे.
– अरे पच्चास खोका तुमने खाया महाराष्ट्राने क्या पाया… जितेंद्र आव्हाडांची कविता.
– माझा डीएनए हिंदू आहे. स्वाभीमानी हिंदूचा डीएनए आहे. गद्दारीचा डीएनए नाही.
– महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार या तीनच राज्यांमध्ये दंगली का घडत आहेत. कारण याच तीन राज्यातून परिवर्तनाची नांदी होत आहे.
– भारताला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानच बांधून ठेवणार आहे. तेच संविधान आपल्याला वाचवायचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -