बाळासाहेब, उद्धव ठाकरेंच स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं- दीपक केसरकर

deepak kesarkar

राज्यातील दोन आठवड्यांच्या सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर २४ तासातचं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीवर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शिवसैनिक बसावा. हे स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे. हिंदुत्वाचा जो विचार होता तो पुन्हा भगवा फडकायला लागला आहे,” अशी प्रतिक्रिया दीपक केसकर यांनी दिली आहे.

“उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी विचारलं होतं तिथे गेल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री करणार का? ते झालं तर मला आनंद होईल. सगळा एक सुवर्ण योग जुळून आला आहे. जी इच्छा उद्धव ठाकरेंची होती की, त्यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं एका शिवसैनिकाला मुख्य़मंत्री करायचे होते. तो शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे होते, हे अनेक वेळा त्यांनी आम्हाला बोलून दाखवले आहे. ज्या विचारावर भाजप शिवसेना एकत्र राहिली ते विचारही मार्गी लागले आहेत,” अशी भावना केसकर यांनी व्यक्त केली आहे.

“प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये हा निश्चितपणे आनंदाचे वातावरण असल्याची खात्री आहे. आनंदाचा दिवस आहे. स्वत:चे 106 आमदार असतानाही भाजपने निर्णय घेतला. यात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, नड्डा यांनी तर निर्णय घेतलाच. पण यात देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखवलं आहे. जे महाराष्ट्राचे ५ वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांनी मंत्रिमंडळाबाहेर राहून पूर्णपणे सहकार्य करेन असं आश्वासन एकनाथ शिंदे यांना दिलं होतं, मात्र जेव्हा पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे, ते मंत्रिमंडळात आल्याने मंत्रिमंडळाला स्थिरता लाभेलच. परंतु त्यांच्या काळात जे प्रकल्प सुरु झाले ट्रान्स हार्बर, मेट्रोच्या अनेक लिंक्स त्यांच्या काळात सुरु झाल्या. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीशी त्यांचे खूप चांगले सबंध आहेत, त्यामुळे दिल्लीवरून मागणारी परवानगीसाठी शिंदे यांनी मदत होणार आहे. आणि दोघांचे एकमेकांसोबत असलेले संबंध खूप छान आहेत. हा भाजपचा चांगला निर्णय आहे. असही दीपक केसरकर म्हणाले.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी दिलेल्या शुभेच्छांवर केसकर म्हणाले की, “अत्यंत समजस्य नेता कसा असतो, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे, त्यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले, त्यांची पार्श्वभूमी सांगितली, साताऱ्यातील कुठल्या भागातून आले हे सांगितलं आणि त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा केली. त्याबरोबर फडणवीसांनी याचा आवर्जुन उल्लेख केला की, एकनाथ शिंदे यांनी माझा वेळोवेळी सल्ला घेतला आहे. तो त्यांचा मौलवान सल्ला लाभत राहिला. तर खात्री आहे की महाराष्ट्राची शरद पवारांना जेवढी माहिती आहे तेवढी कोणालाच नाही, महाराष्ट्राच्या हितासाठी ही सर्व लोकं एकत्र आले तर महाराष्ट्र निश्चितपणे बलवान होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“एकनाथ शिंदे सर्वाधिकार दिले त्यानंतर आम्ही त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा केली नाही, अनेक लोकांनी मला विचारले तुम्ही मंत्री बनणार आहात का? तर अशी कोणतीही मागणी मी स्वत: आणि आमच्या सहकार्यांनी केली नाही”, असही केसरकर म्हणाले.


एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली