घरमहाराष्ट्रमहामोर्चात काँग्रेस नेते अशोक चव्हाण सहभागी होणार नाहीत, वाचा काय आहे कारण...

महामोर्चात काँग्रेस नेते अशोक चव्हाण सहभागी होणार नाहीत, वाचा काय आहे कारण…

Subscribe

Ashok Chavan | गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण काँग्रेस आणि महाविकास आघाडीतून साईडलाईन झाल्याची चर्चा आहे. तसंच, महाविकास आघाडीच्या अनेक बैठकांमध्ये त्यांची अनुपस्थिती राजकीय चर्चांना बळ देत होती. शिवाय, गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातत्याने बैठकींना हजर राहत असताना अशोक चव्हाण मात्र हजर नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मुंबई – महापुरुषांच्या अपमानप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेलं असताना महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मौन बाळगले होते. महामोर्चाच्या निमित्ताने झालेल्या बैठकांमध्येही त्यांनी दांडी मारली. त्यामुळे अशोक चव्हाण पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, आता त्यांनी याबाबत मौन सोडले आहे. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा – मविआच्या महामोर्चाला अखेर पोलिसांची परवानगी मिळाली, पण ‘या’ अटी-शर्थींसह!

- Advertisement -

“महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार सौ. अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील. कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्या,” असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण काँग्रेस आणि महाविकास आघाडीतून साईडलाईन झाल्याची चर्चा आहे. तसंच, महाविकास आघाडीच्या अनेक बैठकांमध्ये त्यांची अनुपस्थिती राजकीय चर्चांना बळ देत होती. शिवाय, गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातत्याने बैठकींना हजर राहत असताना अशोक चव्हाण मात्र हजर नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसंच, ते भाजपात जाणार असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. म्हणूनच त्यांनी महामोर्चाच्या नियोजन बैठकीत दांडी मारली असल्याचं बोललं जात होतं. मात्र, निकटवर्तीयाच्या लग्नकार्यामुळे आपण महामोर्चाला येऊ शकणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, या महामोर्चाला आपला पाठिंबा असल्याचंही त्यांनी घोषित केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा महामोर्चाची तुलना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी, विरोध करणाऱ्यांना संजय राऊत म्हणाले…

महामोर्चाला मिळाली परवानगी

महापुरुषांचा अपमान, महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अशा अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीने उद्या, १७ डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या महामोर्चाला आधी परवानगी मिळाली नव्हती. मात्र, आता या महामोर्चाला पोलिसांची परवानगी मिळाली आहे. भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास मिल ते जेजे ब्रिज मार्गे टाईम्स ऑफ इंडियापर्यंत या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. टाइम्सच्या इमारतीसमोर मविआतील नेत्यांची भाषणे होणार असल्याचं सांगण्यात येतंय. मुंबई महापालिकेकडून परवानगी मिळाल्यास येथे सभा होईल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -