घरमहाराष्ट्रराहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष; शिंदे सरकारचा पहिला विजय

राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष; शिंदे सरकारचा पहिला विजय

Subscribe

मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे सरकारची आज पहिल्या विजयाची नोंद केली. या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी आमने- सामने होते. त्यात राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि 30 जूनला भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांच्या गटाने सरकार स्थापन केले. त्यानंतर तीनच दिवसांनी या सरकारला पहिल्या चाचणीला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला परवानगी दिली. राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला होता. तर राजन साळवी यांच्यासाठी काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी प्रस्ताव मांडला. त्यानुसार झालेल्या निवडणुकीत 164 मतांनी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी झाले. तर, राजन साळवी यांना आघाडीची 107 मते मिळाली.

- Advertisement -

हेही वाचा – बंडखोर आमदारांना अतिरेक्यांसारखं आणलं; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

मनसेचे मत भाजपाला
या निवडणूक प्रक्रियेत समाजवादी पक्षाचे दोन आणि एमआयएमचा एक आमदार तटस्थ राहिला. मनसेचे आमदार राजू पाटील तसेच बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यासह तीन आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान केले. सध्या कारागृहात असलेले राष्ट्रवादीचे अनिल देशमुख व नवाब मलिक यावेळी अनुपस्थित होते.

- Advertisement -

जय श्रीरामच्या घोषणा
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर करताच सभागृहात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना अध्यक्षांच्या आसनापर्यंत नेले.

हेही वाचा – शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयाला कुलूप, कारण काय?

व्हिप झुगारल्याची नोंद
शिवसेना आमदारांनी पक्षादेश (व्हिप) झुगारल्याची नोंद घेण्यात आल्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितले. या मतदानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग झाले असून त्यात पक्षादेश न पाळल्याचेही नोंदवले गेले असल्याचे झिरवळ म्हणाले.

हेही वाचा – भाजपला शिवसेनेशिवाय पर्याय नाही; संजय राऊतांचा टोला

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -