घरताज्या घडामोडीमविआत बिघाडी? बैठकीत न ठरलेले मुद्देही मुलाखतीत मांडले, भास्कर जाधवांची नाराजी

मविआत बिघाडी? बैठकीत न ठरलेले मुद्देही मुलाखतीत मांडले, भास्कर जाधवांची नाराजी

Subscribe

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसत्ता या वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यावरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून महाविकास आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात आता उधाण आलं आहे. काँग्रेस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोकसत्ताला दिलेली मुलाखत मी वाचली. तसेच मी राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांचीही मुलाखत पाहिली. परंतु बैठकीत न ठरलेले मुद्देही मुलाखतीत मांडले, असं भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर जाधव यांनी शिवसेना भवनात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आमच्या पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची प्रकृती बरी नसतानाही, जे लोक पाठिंबा देण्यासाठी येत होते, तेव्हा त्यांनी लोकांना भेटण्याचं काम केलं. आपल्या पदाधिकाऱ्यांशी ऑनलाइन संपर्क साधला. राज्यातील काही भागात सभाही घेतल्या. आता उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. पदाधिकारी संभाव्य लढाईच्या दृष्टीने सजग असावेत म्हणून आजची बैठक बोलवण्यात आली आहे, असं भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी सिल्व्हर ओकवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. या बैठकीत काय धोरणात्मक निर्णय झाला ते तिन्ही पक्षांना सांगितलं होतं. मात्र, काँग्रेसचे नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी आपली भूमिका व्यक्त केली. परंतु तिघांनी समोर येऊन एक सांगायचं आणि मुलाखतीत मात्र वेगळं काही सांगायचं, असं भास्कर जाधव म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : “नार्वेकर तर मोठे वकील, आम्ही अनपढ..”; जितेंद्र आव्हाडांची खोचक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -