घरताज्या घडामोडीनिर्णय चुकीच्या पद्धतीने लागला तर त्याचा परिणाम शिवसेनेवर कमी आणि..,भास्कर जाधवांनी व्यक्त...

निर्णय चुकीच्या पद्धतीने लागला तर त्याचा परिणाम शिवसेनेवर कमी आणि..,भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत

Subscribe

ठाकरे सरकार ज्या विश्नासघाताने पाडले गेले. तसेच ही लढाई अद्यापही सुप्रीम कोर्टात सुरू आहे. हे प्रकरण शिवसेनेशी संबंधित असलं तरी त्याचा परिणाम देशातील लोकशाहीवर होऊ शकतो. न्यायाने, नीतीमत्तेने आणि कायद्याने सुप्रीम कोर्टाचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने लागला पाहीजे. परंतु दुर्दैवाने काही चुकीच्या पद्धतीने निर्णय लागला तर त्याचा परिणाम शिवसेनेवर कमी आणि देशातील लोकशाहीवर जास्त होईल, अशी खंत शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.

भास्कर जाधवांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे विविध परिणाम पाहायला मिळतील. परंतु वेळ लागेल. मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच निकाल लागेल. निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा ही शिंदे गटाची मागणी कशाच्या जीवावर आहे?, मूळ शिवसेनेतील ४० आमदार विश्वासघातानं बंडखोरी केली म्हणून ते पक्षावर दावा करतात, असं भास्कर जाधव म्हणाले.

- Advertisement -

आगामी निवडणुका नोव्हेंबरमध्ये झाल्या तर शिवसेनेच्या दृष्टीने धनुष्यबाण चिन्ह महत्त्वाचं आहे. शिवसेनेने जेव्हापासून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून हे आमचं चिन्ह आहे. चिन्हाचा जो निर्णय व्हायचा आहे तो होईल. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राला येऊन संपूर्ण राज्यालाच आव्हान दिलं आहे. १०६ हुतात्मे महाराष्ट्राने देऊन मुंबई मिळवली. ते जिंकण्याचं स्वप्न गेली अनेक वर्ष पाहत असल्याचं अमित शाह यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा : ठाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -