घरमहाराष्ट्र...म्हणून जितेंद्र आव्हाड वेडेचाळे करतायेत; आशिष शेलारांचे टीकास्त्र

…म्हणून जितेंद्र आव्हाड वेडेचाळे करतायेत; आशिष शेलारांचे टीकास्त्र

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंब्र्यात एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेय, ठाण्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ करत आंदोलन केले. तसेच याप्रकरणी मविआच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारींची भेट घेत ही कारवाई चुकीचे असल्याचे म्हटले आहे. मात्र दुसरीकडे भाजपकडून याप्रकरणी आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यावरून भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावी अशी मागणी केली आहे. शेलार आज माध्यमांशी बोलत होते.

आशिष शेलार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणे आणि त्यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा यांचा काय संबंध आहे. जितेंद्र आव्हाड निर्दोष असतील तर त्यांनी कायदेशीरपणे आपली बाजू लढवावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानात प्रत्येकाला निर्दोषत्व सिद्ध करण्याची मुभा आहे, जेव्हा निर्दोषत्व सिद्ध करता येत नाही तेव्हा असे वेडेचाळे केले जातात, म्हणत शेलारांनी आव्हाडांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

आव्हाडांच्या राजीनाम्याचा आणि त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा काहाही संबंध नाही, जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. आम्ही ती जागा जिंकू, असही शेलार म्हणाले. त्यामुळे शेलारांच्या टीकेला आता राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आव्हाडांच्या राजीनाम्यास पूर्णपणे गृहमंत्री जबाबदार असल्याचे राष्ट्रवादीचं मत आहे. यावर शेलार म्हणाले की, होय खरं आहे. गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सामान्य मराठी माणसाला, मराठी कुटुंबाला त्यावर कोणी आरोप, प्रत्योरोप, जबरदस्ती, विनयभंग, दादागिरी आणि मारहाण करु नये, केल्यास त्यावर कारयदेशीर बडगा उगारला जाईल, हे गृहमंत्र्यांनी दाखवलं आहे. त्यासाठी गृहमंत्र्यांचं स्वागत आणि अभिनंदन आम्ही करतो, असही शेलार म्हणाले.


हेही वाचा : पाच-सहा फुटांवर मुख्यमंत्री होते, विनयभंगासंदर्भात खुलासा करावा; अजित पवारांचा शिंदेंवर पलटवार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -