घरताज्या घडामोडीदेशाबाहेर जाऊन भारताची बदनामी करणारे देशद्रोही; मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

देशाबाहेर जाऊन भारताची बदनामी करणारे देशद्रोही; मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Subscribe

देशाबाहेर जाऊन भारताची बदनामी करणारे देशद्रोही आहेत. हिंदूत्व घराघरात पोहोचले तर त्यांचे दुकान बंद होणार आहे. बाहेरच्या देशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे, ही कुठली लोकशाही? असा सवाल उपस्थित करत मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेतला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला

देशाबाहेर जाऊन भारताची बदनामी करणारे देशद्रोही आहेत. हिंदूत्व घराघरात पोहोचले तर त्यांचे दुकान बंद होणार आहे. बाहेरच्या देशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे, ही कुठली लोकशाही? असा सवाल उपस्थित करत मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेतला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. (CM Eknath Shinde Slams Congress Leader Rahul Gandhi)

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच एकनाथ शिंदेंची अयोध्येमध्येही पत्रकार परिषद होती. यामध्ये एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, राज्यातील महाविकास आघाडीवर ही टीका केली. विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधींवरही टीका केली.

- Advertisement -

“जे सत्तेत होते ते आता 40 वर आले आहेत. हिंदूत्वाची काही लोकांना अॅलर्जी आहे. हिंदूत्वाला आणि सावरकरांना बदनाम करण्याचे काम काही लोक करत आहेत. हिंदूत्व घराघरात पोहोचले तर त्यांचे दुकान बंद होणार आहे. बाहेरच्या देशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे, ही कुठली लोकशाही? देशाबाहेर जाऊन भारताची बदनामी करणारे देशद्रोही आहेत”, अशा शब्दांत नाव नं घेता एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका केली.

दरम्यान, “राम मंदिर व्हावे ही सर्वांचीच इच्छा होती. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेही स्वप्न होते. देशातील हिंदुत्वावादी विचारांच्या रामभक्तांचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर व्हावे. अयोध्या व राम मंदिर हे हिंदुत्वाचे प्रतिक आहे. रामाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील काही ट्रस्टींनी जुनी अवशेष दाखवली. तसेच, मंदिर बनवण्याचे काम पाहिले”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

संध्याकाळी शरयू नदीवर आरती करणार

“मुख्यमंत्री झाल्यावर सर्व आमदार खासदार यांच्यासोबत दशनाला आलो. यापूर्वी मी नियोजन करण्यासाठी यायचो, पण आता कार्यकर्ता यांनी नियोजन केले. मंगल पवित्र वातावरण तयार केले आहे. आपले संपूर्ण सरकार आले होते, मंत्री आणि उपमुख्यमंत्री आले होते. संध्याकाळी शरयू नदीवर आरती करणार आहे”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा – 2024च्या जानेवारीमध्ये रामाच्या मूर्तीची स्थापना होणार – मुख्यमंत्री शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -