घरताज्या घडामोडीDapoli Nagar Panchayat Election 2022 : दापोली नगरपंचायतीत अनिल परबांची सरशी तर...

Dapoli Nagar Panchayat Election 2022 : दापोली नगरपंचायतीत अनिल परबांची सरशी तर रामदास कदमांना धक्का

Subscribe

दापोली नगरपंचायतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी मिळवली आहे. दापोलीत रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा करिश्मा पाहायला मिळाला आहे. या नगरपंचायतीत राष्ट्रवादीला ७ तर शिवसेना ७ अशा समसमान जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना धक्का बसला आहे.

दापोलीतील निकाल –

एकुण जागा १७

- Advertisement -

शिवसेना – ७
राष्ट्रवादी- ७
इतर(अपक्ष)- २
भाजप- १
काँग्रेस- ०

दापोलीतील आतापर्यंतच्या निकालानुसार शिवसेना ७, राष्ट्रवादी ७, इतर (अपक्ष) २ , काँग्रेस ० आणि भाजपने १ जागेवर विजय मिळवला आहे. तसेच एकूण १७ जागांसाठी येथील निवडणूक झाली होती. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीची निवडणूक शिवसेना नेते रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील संघर्षामुळे गाजत असून रामदास कदमांना मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

दरम्यान, नाशिकच्या कळवणमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे. नाशिक-देवळा नगरपंचायतीत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोधी विजय झाले आहेत. अहमदनगरच्या कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाला आहे. जालन्याच्या बदनापूरमध्ये राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराची निवडण बिनविरोधी झाली आहे. जालन्याच्या मंठामध्ये शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. नांदेडच्या नायगावमध्ये काँग्रेस आणि भाजपला प्रत्येक दोन जागेवर विजय मिळाला आहे.


हेही वाचा : kudal nagar panchayat election 2022 : सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये राणेंना मोठा धक्का, शिवसेना, कॉंग्रेसला मताधिक्य


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -