घरताज्या घडामोडीसरकारमध्ये जाणार नसल्याची घोषणा केली आणि...देवेंद्र फडणवीसांनी उघडलं गुपित

सरकारमध्ये जाणार नसल्याची घोषणा केली आणि…देवेंद्र फडणवीसांनी उघडलं गुपित

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं आहे. मात्र, सर्वात महत्वाचं म्हणजे १०६ आमदारांचा पाठिंबा असूनही देवेंद्र फडणवीसांनी ४० आमदारांचा पाठिंबा असलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं आणि स्वत: उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज्यात जनतेसह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

राजकीय नाट्य संपल्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर फडणवीस नागपुरात दाखल झाले. नागपुरात दाखल झाल्यानंतर त्यांच जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. यादरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अडीच वर्षापूर्वी २०१९ला महाराष्ट्रात तुम्ही भाजपा-शिवसेनेचं सरकार आणलं. पण आपल्याशी बेइमानी झाली. आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच त्यांनी सरकार स्थापन करतेवेळी काय त्रुटी आल्या, याचं देखील गुपीत त्यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं पाहीजे, हे त्यांनी मान्य केलं. मी म्हटलं होतं की हे सरकार बनवेन, पण मी सरकारमध्ये जाणार नाही. तशी घोषणाही केली होती. मात्र, ज्यावेळी राज्यपालांना पत्र देऊन पत्रकार परिषद झाली. ती प्रेस कॉन्फरन्स करून मी घरी गेलो. त्यावेळी मला जे.पी. नड्डा यांचा फोन आला. त्यांनी मला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास सांगितली. मात्र, त्यावेळी माझी मनाची तयारी नव्हती. आपण बाहेर राहून या सरकारची मदत केली पाहीजे, अशी माझी मानसिकता होती. परंतु यावर पीएम मोदींची चर्चा झाली. शेवटी मोदींशी संवाद केल्यानंतर पक्षाचा आदेश हाच महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन एकच निर्णय घेतला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काँग्रेसच्या काळात मुख्यमंत्री असला तरी त्यावर बाहेरून नियंत्रण ठेवलं जायचं. अर्थात दोन शक्तीस्थळे असायची. यावरून आपण काँग्रेसवर टीका करत आलो आहोत. मग आपण तशा पद्धतीने काम करणे उचित होणार नाही. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्या, जेणेकरून दोन शक्तीस्थळे होणार नाही, असं शहा यांनी म्हटल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

- Advertisement -

२०१४चं सरकार आल्यानंतर वर्षभराच्या वर सरकार चालणार नाही असे म्हणायचे. पण ४० वर्षांनंतर पहिल्यांदा ५ वर्ष पूर्ण करणारा हा देवेंद्र फडणवीस होता. २०२४मध्ये महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा : रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.., एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -