घरमहाराष्ट्रनाशिकछगन भुजबळांची सुरक्षा वाढवा; राष्ट्रवादी युवकची फडणवीसांकडे मागणी

छगन भुजबळांची सुरक्षा वाढवा; राष्ट्रवादी युवकची फडणवीसांकडे मागणी

Subscribe

नाशिक : मागील आठवड्यात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षिततेत कपात करण्यात आली होती. त्यावरून राज्यात चांगलाच वादंग निर्माण झाला. विरोधकांनी सूडाच्या भावनेतून सुरक्षेत कपात केल्याची टीका सत्ताधार्‍यांवर केली. माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांच्याही सुरक्षिततेत कपात करण्यात आली आहे. या संदर्भात भुजबळ यांनीही पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच, गृहमंत्री, विरोधीपक्ष नेता असताना दाऊद सारख्याना अंगावर घेतले असल्याची आठवण करून दिली होती. दरम्यान, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष आंबाडस खैरे यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत भुजबळ यांना पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरक्षा प्रदान करण्याची मागणी केली आहे.

काय म्हंटले आहे पत्रात

महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काही दिवसांपूर्वी काढण्यात आली असून तर इतर व्यक्तींना सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मा.आ.श्री. छगनरावजी भुजबळ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महत्वाचे नेते आहे. तसेच अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष देखील आहे. समाजात नावलौकिकता व प्रतिष्ठीत व्यक्तीची सुरक्षा राज्य सरकारकडून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री श्री. छगन भुजबळ  हे ओबीसी नेते असून ते बहुजन समाजाच्या न्यायहाक्कासाठी नेहमी लढा देत असतात. समाजाच्या प्रश्नासाठी त्यांचा देशभर वावर असतो. ओबीसी आरक्षण, मनुस्मृती जाळणे यासारख्या जिवंत प्रश्नांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मा.श्री. छगन भुजबळ हे गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात देखील काम करत असताना याठिकाणी सुद्धा त्यांना धोका असतो. विविध सनातनी संघटनांकडून मा. आ. श्री छगन भुजबळ साहेब यांना मारण्याच्या धमक्या वेळोवेळी मिळत असतात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे कार्यकर्ते मा.आ.श्री.छगनरावजी भुजबळ साहेबांच्या विरोधात नेहमी आंदोलने करतात. तरी, मा.आ.श्री.छगनरावजी भुजबळ साहेब हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व अति महत्वाची राजकीय व्यक्ती असून विविध सनातनी प्रवृतींपासून त्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांना अधिकची सुरक्षा देणेबाबत उपाययोजना करण्यात यावी, ही विनंती. : अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -