घरमहाराष्ट्रतो राबडी देवी म्हणाला, फुलन देवी नाही, 'त्या' विधानाचं चंद्रकांत पाटलांकडून समर्थन

तो राबडी देवी म्हणाला, फुलन देवी नाही, ‘त्या’ विधानाचं चंद्रकांत पाटलांकडून समर्थन

Subscribe

ते म्हणाले, महिलांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारची प्रवृत्तीही माझा तो बळवंतराव दुसऱ्याचा तो बाब्या अशी आहे. त्यांनी महिलांना काही बोललं तरी चालत, पंतप्रधानांना काही म्हटलं तरी चालतं, मात्र भाजपच्या सोशल मीडियाच्या जितेन गजारिया यांच्या विरोधात मात्र यांनी वॉरंट काढलं. बरं काय म्हणाला तो राबडी देवी, ही काय शिवी आहे का? तो फुलन देवी नाही म्हणाला, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय.

मुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या आयटी सेलच्या जितेन गजारियानं केलेल्या वक्तव्याचं समर्थन केलंय. भाजपच्या जितेन गजारियानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंना राबडी देवी असं संबोधले होते. त्याच विधानाला आता चंद्रकांत पाटलांनी पाठिंबा दिलाय. एका वृत्तवाहिनीकडे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, महिलांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारची प्रवृत्तीही माझा तो बळवंतराव दुसऱ्याचा तो बाब्या अशी आहे. त्यांनी महिलांना काही बोललं तरी चालत, पंतप्रधानांना काही म्हटलं तरी चालतं, मात्र भाजपच्या सोशल मीडियाच्या जितेन गजारिया यांच्या विरोधात मात्र यांनी वॉरंट काढलं. बरं काय म्हणाला तो राबडी देवी, ही काय शिवी आहे का? तो फुलन देवी नाही म्हणाला, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय.

- Advertisement -

राबडी देवी तो म्हणाला कारण बिहारमध्ये त्या मुख्यमंत्री झाल्या जेव्हा लालू यादव यांना जेलमध्ये जावे लागले. त्याने केवळ उपमा दिली. तरी आम्ही त्याला समाज दिली. आपली संस्कृती ही महिलांबाबत योग्य शब्दांत बोलण्याची आहे. पण त्याच्यावर केस दाखल झाली, मग नाना पटोलेंवर केस कधी दाखल होणार?, असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केलाय. आज आम्ही पुण्यात त्यांच्या विरोधात केस दाखल करणार आहोत. नाना पटोले यांनी पंतप्रधानांना नौटंकी म्हटले, गृहमंत्र्यांवर आरोप केले, त्यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार, असा प्रश्नही चंद्रकांत पाटलांनी विचारलाय.

रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतात, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवावा असा सल्ला दिला होता. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले होते. रश्मी ठाकरे या उत्तम प्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात, असं ते म्हणाले होते. त्या पदड्याच्या मागे काम करत असतात. त्या पडद्याच्या पुढे नाहीत; पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बर्‍यापैकी माहिती आहे. कारण त्या उद्धव ठाकरेंच्या सोबत राहतात. आदित्य ठाकरे कसे काम करतात, उद्धव ठाकरे कसे काम करतात, या सर्वांच्या पेक्षा एक महिला म्हणून त्यांचे नियोजन, कशा पद्धतीने महिला सक्षम व्हायला पाहिजेत, त्यांचे बळकटीकरण कसे व्हायला पाहिजे, महिलांना फक्त चूल आणि मूल न करता, त्यांना सक्षम कसे करायला पाहिजे यासाठी रश्मी ठाकरे प्रयत्न करत असतात, असेही अब्दुल सत्तार म्हणाले होते.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -