घरताज्या घडामोडीSamruddhi Highway : हा महामार्ग न होण्यासाठी अनेकांनी आम्हाला विरोध केला; फडणवीसांचा...

Samruddhi Highway : हा महामार्ग न होण्यासाठी अनेकांनी आम्हाला विरोध केला; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

'समृद्धी महामार्ग होऊ नेये यासाठी अनेकांनी आम्हाला विरोध केला होता. विशेष म्हणजे त्यावेली आमच्यासोबत असलेले उद्धव ठाकरे, शरद पवार यांनीही विरोध केला होता', असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

‘समृद्धी महामार्ग होऊ नेये यासाठी अनेकांनी आम्हाला विरोध केला होता. विशेष म्हणजे त्यावेली आमच्यासोबत असलेले उद्धव ठाकरे, शरद पवार यांनीही विरोध केला होता’, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. (Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Highway DCM Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray)

“हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाकरीता भूसंपादन करण्यासाठी नवीन कायदा परित केला. नवीन दर शेतकऱ्यांना दिला. पण त्यावेळी हा महामार्ग होऊ नेये यासाठी अनेकांनी आम्हाला विरोध केला होता. विशेष म्हणजे त्यावेली आमच्यासोबत असलेले उद्धव ठाकरे यांनी संभाजी नगर येथे सभा घेतली होती. या सभेत त्यांनी हा महामार्ग होऊ शकत नाही. आम्ही होऊ देणार नाही. आम्ही एक इंचही जमीन या महामार्गासाठी देणार नाही अस म्हटले होते. त्यानंतर शरद पवार यांनीही नगर जिल्ह्यात बैठक घेतली आणि हे शक्य नाही आणि करता येणार नाही असे सांगितले”, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

- Advertisement -

“परंतु, एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी नगर जिल्ह्यातील गावांत जाऊन लोकांशी जाऊन बातचीत केली. त्यांच्याकडून राजीनामे घेतले. त्यावेळी त्या गावातील लोकांनी आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत असे सांगितले. देशभरातील ही रेकॉर्डब्रेक कामगिरी ठरली. कारण 700 किलोमीटरचा संपूर्ण महामार्ग ग्रीनफिल्ड आणि त्यासाठी 9 महिन्यात कागदपत्रं गोळा करण्यात आली होती”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन केले, त्यावेळ मला अनेक विरोधी पक्षाच्या आमदारांनी सांगितले की, आम्हाला खरं वाटलं नव्हतं, आम्हाला असं वाटायचं की, तुम्ही ठोकताय, तुम्ही सांगताय, तुम्ही भाषणं करतायं हा महामार्ग 15 ते 20 वर्षांशिवाय होऊ शकत नाही. पण हा महामार्ग झाला. यासाठी मी नाशिक-शिर्डी येथील सर्वांचे आभार मानतो की त्यांनी या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात आम्हाला साथ दिली”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Samruddhi Highway : ‘अनेकांना ही केवळ घोषणा…’, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -