घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update : राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ ; दिवसभरात तब्बल 46...

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ ; दिवसभरात तब्बल 46 हजार 197 नवे रुग्ण

Subscribe

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.  त्यातच राज्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. काल बुधवारच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ तर, मृत्यू दरात घट झालेला पाहायला मिळत आहे. आज राज्यात 46 हजार 197 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.तर आज 24 तासात 52 हजार 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, घरी परतले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.  त्यातच राज्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. काल बुधवारच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ तर, मृत्यू दरात घट झालेला पाहायला मिळत आहे. आज राज्यात 46 हजार 197 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.तर आज 24 तासात 52 हजार 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52% एवढे झाले आहे.राज्यात आज रोजी एकूण 2 लाख 64 हजार 708 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 37 कोरोना मृतांची नोंद झाल्याने मृत्यूदर 1.92 टक्क्यांवर पोहचला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 73 लाख 71 हजार 757 झाली आहे.राज्यात आजपर्यंत एकूण 69 लाख 67 हजार 432 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.राज्यात 24 लाख 21 हजार 501 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3,391 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये उपचार घेत आहेत. याशिवाय राज्यात आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 27 लाख 45 हजार 348 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 73 लाख 71 हजार 757 (10.13 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.राज्यात आज रोजी एकूण 2 लाख 58 हजार 569 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

आज राज्यात 125 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी 87 रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने, 38 रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांनी रिपोर्ट केले आहेत.आजपर्यंत राज्यात एकूण 2 हजार 199 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.


हे ही वाचा – मुंबईत विकासकामात बाधक ठरणाऱ्या ४२९ झाडांची कत्तल, पालिकेची परवानगी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -