फडणवीसांच्या मेळाव्यात शिंदे गटातील आमदारांची हजेरी; गळ्यात दिसला भाजपचा गमछा

maharshtra political crisis bhandara independent mla narendra bhondekar attends bjp program in presence of devendra fadanvis

राज्यात भाजपच्या नेतृत्त्वाखाली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून शिंदे गटावर आरोप झाल्यास भाजप बाजू सावरून घेण्यास पुढे सरसावत आहे. विरोधकांच्या प्रत्येक ठीकेला भाजपकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते. अशात भाजपच्या कार्यक्रमांदेखील शिंदे गटातील आमदार उपस्थित राहत असल्याचे दिसतेय. नुकतेच शिंदे गटात सहभागी झालेले आमदार नरेंद्र भोंडेकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेळाव्याला उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांच्या गळ्यात भाजपचा गमछा देखील पाहायला मिळाला. त्यामुळे भोंडेकर भाजपच्य गटात सामील होतात की काय अशी चर्चा रंगतेय. भंडारा जिल्ह्यातील या मेळाव्याची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु झाली आहे.

गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामगिरीचा गैौरव करण्यासाठी भाजपतर्फे भंडाऱ्याचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी मेळाव्याचं आयोजन केले होते. यावेळी भंडारा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर या मेळाव्यात उपस्थित राहिले होते. नरेंद्र भोंडेकर आज मंचावर देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसून गप्पा मारताना दिसले. विशेष म्हणजे गळ्यात भाजपचा गमछा घालून ते या मेळाव्यात उपस्थित होते. यावेळी नरेंद्र भोंडेकरांच्या गळ्यात गमछा पाहून उपस्थितही चक्रावले.

यावेळी नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मला गुरुस्थानी आहेत. फडणवीसांमध्ये राज्याचेच नाही तर देशाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता आहे. भविष्यात भंडारा नगरपरिषद ही भाजपची असेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नरेंद्र भोंडेकर नेमके आहेत तरी कोण?

नरेंद्र भोंडेकर हे 2009, 2019 मध्ये भंडारा मतदारसंघातून अपक्ष म्हणून आमदार पदी निवडून आले, दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर भोंडेकर देखील शिंदे गटात सहभागी झाले, शिंदे गटात सामील झालेल्या दहा अपक्ष आमदारांपैकी भोंडेकर एक होते.

मात्र आता नरेंद्र भोंडेकर यांची भाजपसोबत जवळीक मोठ्याप्रमाणात वाढतेय. खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना भोंडेकर यांनी भाजपचा आसरा घेतल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे शिंदे गटाचं लक्ष्य असलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या जागेवर भाजपने उमेदवार देत एक जागा आपल्याकडे करून घेण्याचा प्रयत्न केला, त्याता आता आणखी एका अपक्ष आमदारालाही स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचे बोलले जात आहे.


आदित्य ठाकरेंच्या वरळीतच शिवसेनेला मोठा धक्का; शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश