घरताज्या घडामोडीमुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; IMDकडून ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; IMDकडून ऑरेंज अलर्ट जारी

Subscribe

मुंबईसह आसपासच्या परिसरा मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सकाळपासून पावसाने मुंबईत (Mumbai) हजेरी लावली होती.

मुंबईसह आसपासच्या परिसरा मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सकाळपासून पावसाने मुंबईत (Mumbai) हजेरी लावली होती. अशातच आता मुंबईत आणखी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. तसेच, ऑरेंज अलर्ट (Orenge Alert) जारी केल्याची माहिती हवामान विभागाने आपल्या दैनंदिन बुलेटिनमध्ये दिली असून, नागरिक आणि प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगितले. (mumbai weather update imd issues orange alert)

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये आज मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाच्या पावसासह आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. शिवाय, येत्या दोन किंवा तीन दिवसांत शहरात सुमारे १३० मिमी पाऊस पडू शकतो, त्यामुळे पाणी साचू शकते, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – आसाममध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या दोन पोलिसांचा मृत्यू

मुंबई आणि उपनगरातील बहुतांश भागात आठवड्याच्या शेवटीही हलक्या सरी बरसल्या. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहिले असून मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात अधूनमधून पाऊस पडत आहे. राजधानी मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन होऊन एक आठवडा उलटून गेला असताना, या कालावधीतील बहुतांश भागात पाऊस कमी झाला आहे.

- Advertisement -

पहिल्याच पावसात मुंबईत अपघात

दरड कोसळून (Land slide) दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबईतील चेंबूरच्या न्यू भारतनगर (New Bharat Nagar Chembur) परिसरात घडली. अरविंद प्रजापती आणि आशिष प्रजापती अशी जखमी झालेल्या स्थानिकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही भाऊ असून, त्यानंतर या जखमींना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.


हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया पूर्ण, प्रकृतीबाबत रूग्णालयाच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात येणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -