आता अनिल परब यांनी बोजा बिस्तरा तयार ठेवावा, किरीट सोमय्यांचा इशारा

मग त्या बांधकामाचा खर्च कोणी केला, 100 कोटींची सचिन वाझेची जी वसुली येत होती, त्यातही अनिल परबचे नाव होते. अनिल परबचे सगळे काळे कारनामे बाहेर येतील ना, त्यावेळी महाराष्ट्रातील जनता ठाकरे सरकार आणि परिवाराला सोडणार नाही, असंही किरीट सोमय्या म्हणालेत.

मुंबईः अनिल देशमुख, त्यानंतर नवाब मलिक आणि आता अनिल परब (anil parab) यांनी बोजा बिस्तरा तयार ठेवावा, अनिल परबांचा शेकडो कोटींचा घोटाळा आहे, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) परिवहन मंत्री अनिल परबांवर निशाणा साधलाय. अनिल परब यांच्या राहत्या घरी आणि शासकीय निवासस्थानासह एकूण ७ जागांवर ईडीने छापेमारी केलीय. त्यावर प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्यांनी अनिल परबांवर टीकास्त्र डागलंय. किरीट सोमय्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

इन्कम टॅक्स असो, कंपनी मंत्रालय असो, संजय कदम त्यांच्या पार्टनर असलेल्याच्या घरी सव्वा तीन कोटी रुपये रोख रक्कम मिळाली होती. 25 कोटींचा बेनामी रिसॉर्ट प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे बेनामी व्यवसाय चालवणाऱ्या अनिल परबला आता जावे लागणार आहे. 25 कोटींचं रिसॉर्ट बांधलं तेसुद्धा स्वतःच्या नावावर, इलेक्ट्रिक कनेक्शन स्वतःच्या नावावर, स्वतः प्रॉपर्टी टॅक्स भरतो आणि मग त्या बांधकामाचा खर्च कोणी केला, 100 कोटींची सचिन वाझेची जी वसुली येत होती, त्यातही अनिल परबचे नाव होते. अनिल परबचे सगळे काळे कारनामे बाहेर येतील ना, त्यावेळी महाराष्ट्रातील जनता ठाकरे सरकार आणि परिवाराला सोडणार नाही, असंही किरीट सोमय्या म्हणालेत.

किरीट सोमय्यांच्या दापोली दौऱ्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी तेव्हा माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पुण्याला माणसं कोणाची होती, अनिल परबचा पार्टनर संजय कदमची, खार पोलीस स्टेशनला पोलीस अधिकाऱ्यांना सूचना कोण देत होते, अनिल परब देत होता. बांद्रा पोलीस स्टेशनला माझ्या नावानं बोगस एफआयआर दाखल करण्याचं धाडस कोणी केलं, अनिल परबमुळे केलं, अनिल परबबरोबर संजय पांडे पोलीस कमिश्नर, त्याने पण जी माफिया पोलीसगिरी सुरू केली, मुंबई पोलीस आयुक्तऐवजी ठाकरे परिवाराचे पोलीस कमिश्नर संजय पांडे बनतात ना, जवाब उनको भी देना पडेगा, असं म्हणत त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंवरही हल्लाबोल केलाय.

पर्यावरण मंत्रालयानं सांगितलं आहे की, अनिल परब धूर्त आहे, चिटर आहे हे ठाकरे सरकारेनंच सांगितलं आहे. पर्यावरण मंत्रालयानं सांगितलेलं आहे. मंत्री असताना दर महिना 15 लाख रुपये कन्सल्टन्सी फी त्याच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होते. मंत्री असताना महाराष्ट्रात लॉकडाऊन आणि हे महाशय सेव्हन स्टार रिसॉर्ट बांधतायत. अनिल परब उद्धव ठाकरेंचा राईट हँड आहे, नंतर पाटणकर आहे ना. त्यांनी पण सांगावं कुठे कुठे काय काय काळी कामं केली आहे, असं म्हणत किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारला सूचक इशारा दिलाय.


हेही वाचाः परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर, शासकीय आणि खासगी निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी