घरमहाराष्ट्रनागपूरPM Narendra Modi : काँग्रेसच्या काळात विदर्भ-मराठवाड्याचा निधी मधेच लुटला जात होता-...

PM Narendra Modi : काँग्रेसच्या काळात विदर्भ-मराठवाड्याचा निधी मधेच लुटला जात होता- मोदी

Subscribe

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीला मी नमन करतो. बाबासाहेबानाही नमन करतो. यासोबतच यवतमाळ, वाशिम या भागातील सर्व बंजारा समाजातील नागरिकांना नमस्कर असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मी दहा वर्षापूर्वी चाय पे चर्चा करण्यासाठी आलो होतो.

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत असून, यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर थेट तर शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली. काँग्रेसच्या काळात विदर्भ- मराठवाड्यासाठीचा निधी मधेच लुटल्या जात होता असे म्हणत आगामी लोकसभा निवडणुकीचे त्यांनी रंगशिंग फुंकले. (PM Narendra Modi During the Congress the funds of Vidarbha Marathwada were looted in between Modi)

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीला मी नमन करतो. बाबासाहेबानाही नमन करतो. यासोबतच यवतमाळ, वाशिम या भागातील सर्व बंजारा समाजातील नागरिकांना नमस्कर असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मी दहा वर्षापूर्वी चाय पे चर्चा करण्यासाठी आलो होतो. तेव्हा येथील नागरिकांनी एनडीएला भरभरुन आशीर्वाद दिला. 2019 मध्येही तेच केले. आता 2024 च्या निवडणुकीआधी विकास कामानिमित्ताने आलो तेव्हाही एकच आवाज घुमत आहे. अबकी बार मोदी सरकार.

- Advertisement -

हेही वाचा : Anil Parab : ‘पार्टी विथ डिफरंस’ कशासाठी? आमदारांच्या गैरवर्तनावरून भाजपावर निशाणा

एवढ्या मोठ्या संख्येने महिला-माता येथे आशीर्वाद देण्यासाठी आल्या. त्या मांताना मी नमन करतो. विदर्भातील सर्व महिलांचा मला आशीर्वाद मिळत आहे. कारण, येथील महिलांनी ठरवले की, एनडीए सरकार 400 पार. पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो. त्यांच्या राज्यकारभाराला साडेतीनशे वर्ष उलटून गेले. जेव्हा शिवाजी महाराज राजे झाले त्यांनी सर्वसामान्यांसाठी काम केलं. आम्हीसुद्धा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन विकासाच्या मार्गावर निघालो आहोत. मागील दहा वर्षांत जे केले ते पुढील 25 वर्षांच्या विकासाची मुहूर्तमेढ आहे. माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण तुम्हाला समर्पीत आहे. भारताला विकसीत करण्यासाठी गरीब, शेतकरी, युवा आणि महिला यांचा विकास, सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहेत. आज शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा मिळत आहेत. गरीबांना पक्के घरं मिळत आहेत. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून मदत तर बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. असल्याचेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Budget Session : चर्चा मुंबईची.. पण गांधी-मोदींच्या नावावरून विधानसभेत झाला गोंधळ

शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीचे जेव्हा केंद्रात सरकार होते, तेव्हा कृषिमंत्री महाराष्ट्रातील होते. तेव्हा विदर्भ-मराठवाड्यासाठी विकास निधी दिला जात होता तो मधेच लुटल्या जात होता. आदिवासींना काहीच मिळत नव्हते. मात्र आज बघा मी फक्त एक बटण दाबले आणि 21 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले. हीच तर मोदींची गॅरंटी आहे.

काँग्रेसच्या काळात 1 रुपया दिल्लीहून निघत होता. त्यातील 15 पैसे पोहोचत होते. जर आज काँग्रेस सरकर असते तर 21 हजार कोटींमधील 18 हजार कोटी लुटल्या गेले असते. मोदींच्या सरकारमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सर्व मोबदला देण्याचं काम केलं जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

डबल इंजिन सरकारकडूनही भरीव मदत

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील डबल इंजिन सरकारकडूनही भरीव मदत केली जात आहे. 11 कोटी लोकांच्या खात्यामध्ये आतापर्यंत किसान योजनेतून दिले आहेत. यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 30 हजार आणि यवतमाळमधील शेतकऱ्यांना 9 हजार कोटी देण्यात आले आहेत. सरकारने ऊसाच्या दरातही 340 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. यासोबतच अन्न साठवणुकीसाठीही मोठी योजना आखली जात असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -