काही अपमान करण्याचा उद्देश नाही, मुख्यमंत्र्यांना तिसऱ्या रांगेत उभे करण्यावरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

pravin darekar

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. परंतु नीती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंना योग्य स्थान न दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली.

एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टवर मांडलं. परंतु काही अपमान करण्याचा उद्देश नाहीये, आता यांना मराठी माणसांचं पडलं आहे, आतापर्यंत कॉंग्रेस दिल्लीच्या तख्तापुढं पाणी भरायचं तेव्हा कुठं गेला होता यांचा स्वाभिमान, असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले प्रवीण दरेकर?

उद्या नीती आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून विकास निधी येईल, तेव्हा त्यांना कळेल महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हितं कसं सांभाळलं जातं. तसेच हा काही अपमान करण्याचा उद्देश नाहीये, आता यांना मराठी माणसांचं पडलं आहे, आतापर्यंत कॉंग्रेस दिल्लीच्या तख्तापुढं पाणी भरायचं तेव्हा कुठं गेला होता यांचा स्वाभिमान, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

ही लोकं वैफल्याने ग्रासलेली आहेत. सत्ता गेल्याने त्यांना आमच्यावर टीका करण्यापलीकडे दुसरं काही पडलेलं नाहीये. मुंबई-महाराष्ट्राचं हीत जपण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे दरेकर म्हणाले. दरम्यान, रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून दरेकरांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या टीकेला काय उत्तर देते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

राम कदमांची प्रतिक्रिया…

रोहित पवार यांच्या या टीकेनंतर भाजप आमदार राम कदम यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपतींनी संबोधित केले त्यावेळी एकनाथ शिंदे हे पहिल्या रांगेत होते. तसेच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ उभे होते. त्यावर ते काही बोलत नाहीत, परंतु, शेवटच्या रांगेवरून टिप्पणी केली जात आहे. अशा गोष्टींवरून टीका करणं योग्य नाही, असं भाजप आमदार राम कदम म्हणाले.


हेही वाचा : औरंगाबादच्या दोन बड्या नेत्यांमध्ये मतभेद, उद्धव ठाकरेंसमोरच दोघेही भिडले