घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनायलॉन मांजातून घुबडाची सुटका

नायलॉन मांजातून घुबडाची सुटका

Subscribe

नाशिक : शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाने पुन्हा डोके वर काढले आहे. टिळक पथ परिसरात एका घुबडाच्या पंखात नायलॉन मांजा अडकल्याने तो जखमी झाला. प्रा. मनीषा भामरे यांनी त्याची सुश्रूषा करुन त्याला मुक्त केले. यंदा कोणाचाही बळी जावू नये, यासाठी पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करुन मांजा जप्त करावा, अशी मागणी नागरिक करु लागले आहेत.

दिवाळी झाली की मांजा विक्री सुरु होते. नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन केले जाते. तर दुसरीकडे शहरात अनेक भागांत नायलॉन मांजाचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. जुने नाशिक परिसर आणि पंचवटी कारंजा, भद्रकाली, सातपूर, सिडको परिसर आणि उपनगरातील काही भागांत कागद किंवा पिशवीत नायलॉन मांजा गुंडाळून ग्राहकांना दिला जात आहे. आजवर अनेक पक्ष्यांचेही बळी या मांजाने घेतले आहेत. टिळकपथ परिसरातील एका झाडाला लटकलेला नायलॉन मांजात एका घुबडाचे पंख अडकल्याने तो जेरबंद झाला होता. ही बाब परिसरातील प्रा. मनीषा भामरे यांच्या लक्षात येताच त्यांनी मांजातून घुबडाची सुटका केली. पक्षीमित्र आनंद बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली या घुबडाची दिवसभर त्यांनी सुश्रूषा केली. रात्रीच्या वेळी त्याला मुक्त सोडण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -