घरताज्या घडामोडीराणेंच्या दशावतारी नाटकावर शिंदेंमुळे पडदा पडला, संजय राऊतांचा बंडखोरांवर बाण

राणेंच्या दशावतारी नाटकावर शिंदेंमुळे पडदा पडला, संजय राऊतांचा बंडखोरांवर बाण

Subscribe

राणे, भुजबळांनी विधानसभेत हेच संगीत नाटक केले होते. त्यापेक्षा शिंदे यांचे नाट्य वेगळे नव्हते. शिंदे यांचे नवीन नाटक रंगमंचावर आल्याने राणे यांच्या दशावतारी नाटकावर पडदा पडला आहे.

शिंदे-फडणवीसांची वक्तव्ये म्हणजे बाजारातील उधारीचा माल आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जोरदार टोलेबाजी केली. पक्ष सोडताना त्या सर्व प्रकरास नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त व्हावे म्हणून नारायण राणे (Narayan Rane), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) वगैरे नेते जसे भावूक झाले होते, तोच आव मुख्यमंत्री शिंदे यांनी आणला. ते हेलावले, अश्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. असे बरेच नाट्य घडले. राणे, भुजबळांनी विधानसभेत हेच संगीत नाटक केले होते. त्यापेक्षा शिंदे यांचे नाट्य वेगळे नव्हते. शिंदे यांचे नवीन नाटक रंगमंचावर आल्याने राणे यांच्या दशावतारी नाटकावर पडदा पडला आहे. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या वगैरे विद्रोही नाटकांवरही लोखंडी चेणे विकम्याची वेळ आली आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. सामनाच्या अग्रलेखात त्यांनी शिंदेवर टीकास्त्र सोडलं. (Sanjay Raut edit on rebel mla and cm eknath shinde)

हेही वाचा – देवेंद्र रात्री वेष बदलून एकनाथ शिंदेंना भेटायचे, अमृता फडणवीसांकडून गुप्तभेटीबाबत गौप्यस्फोट

- Advertisement -

भाजपने शुद्ध करून घेतले

संजय राठोड, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव दांपत्यावर कालपर्यंत लिहिलेल्या संहिता मिठी नदीत फेकून देण्याची आफत आता भाजपवाल्यांवर आली आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्यांना तर धरणीने दुभंगून पोटात घ्यावे असेच वाटत असेल. दोन दिवसांत या मंडळींना तुरुंगात टाकण्याचे संवाद आता जाहीर पत्रकार परिषदांतून कोण फेकणार कारण या सगळ्यांनाच भाजपने शुद्ध करून घेतले आणि देवघरात त्यांच्या प्रतिमा पूजेसाठी ठेवल्या. हे सर्व हिंदुत्त्वाचे व अन्यायाचे परिमार्जन अशा उदात्त नावाखाली झाले, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – आरोह वेलणकरचा संजय राऊत यांना टोला, म्हणाला राऊत अजून…

उधारीचे सरकार

सध्याचे सरकार म्हणजे उधारीचा माल आहे. त्यामुळे ही उधारी चुकवायची कशी हाच प्रश्न आहे. शिवसेनेसाठी आपण कसा त्याग केला असे मुख्मयंत्री शिंदे म्हणलतात. राणे व भुजबळांचेही तेच सांगणे होते. त्यागाच्या बदल्यात काय आणि किती मिळाले याचाही हिशेब द्यायला हवा. शिंदे यांचे एकवेळ मान्य करू, पण त्यांच्याबरोबर गेलेल्या किमान २५ आमदारांनी शिवसेनेसेठी कोठे रत्त सांडले, कोठे लाठ्या खालल्या, घरावर कधी तुळशीपत्र ठेवले हे राज्याच्या जनतेला सांगितले तर बरे होईल, असंही राऊत म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -