घरमहाराष्ट्रठरलं! शिंदे-फडणवीस कॅबिनेटचा उद्या विस्तार, एका क्लिकवर पाहा संपूर्ण यादी

ठरलं! शिंदे-फडणवीस कॅबिनेटचा उद्या विस्तार, एका क्लिकवर पाहा संपूर्ण यादी

Subscribe

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगळता उर्वरित 40 मंत्रिपदांपैकी शिंदे गटाला 15 तर, भाजपाच्या वाट्याला 25 मंत्रिपदे येतील. यात राज्यमंत्र्यांचाही समावेश असणार आहे

मुंबईः शिंदे आणि फडणवीस या दोघांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनून सरकार स्थापन केलं, पण अद्यापही शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काही झालेला नाही. गेल्या महिन्याभरापासून रडखलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर उद्याचा मुहूर्त सापडला आहे. तसेच संभाव्य मंत्र्यांची यादीसुद्धा समोर आली आहे.

विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार दोन टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यात 15 ते 18 मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. मंत्रिवाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार शिंदे गटाला 35 टक्के तर भाजपला 65 टक्के मंत्रिपदं मिळणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगळता उर्वरित 40 मंत्रिपदांपैकी शिंदे गटाला 15 तर, भाजपाच्या वाट्याला 25 मंत्रिपदे येतील. यात राज्यमंत्र्यांचाही समावेश असणार आहे.

- Advertisement -

सध्या शिंदे गटाकडून जवळपास 8 आमदारांच्या नावांची चर्चा आहे. उदय सामंत, दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, भरत गोगावले, सदा सरवणकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, बंटी भांगडिया, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, नितेश राणे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, रवी राणा, गणेश नाईक, सुरेश खाडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार, संजय कुटे या ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत या देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या आमदारांनाही मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या नेत्यांना तातडीने फोन करून मुंबईत बोलावण्यात आलं आहे. भाजपकडून राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील यांना फोन करण्यात आले आहेत. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट, संदिपान भुमरे, भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनाही फोन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात सर्वाधिक विधानसभेचे आमदार पाहायला मिळणार आहेत. विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचंही सांगितलं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचाः मोठी बातमी! जनतेतून निवडून आलेल्यांनाच शिंदे- फडणवीस कॅबिनेटमध्ये संधी?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -