घरमहाराष्ट्र15 वर्षांच्या खासदारकीत शिवसेनेसाठी जिल्ह्यात भांडलो पण... आढळराव पाटलांची खदखद

15 वर्षांच्या खासदारकीत शिवसेनेसाठी जिल्ह्यात भांडलो पण… आढळराव पाटलांची खदखद

Subscribe

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेकडून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. मात्र आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनंतर आता खासदारही एकनाथ शिंदे गटात सामील होत आहे. आता शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामील झाले आहेत. त्यांनी शिंदे गटात उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी खऱ्या अर्थाने सत्तेत आलो अस म्हणत पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली. यानंतर आज शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी मेळावा घेत भूमिका जाहीर केली. तसेच 15 वर्षे मी खासदार राहिलो, शिवसेनेसाठी जिल्ह्यात भांडलो, पण आता एका फेसबुक पोस्टमुळे माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : माझी भावना उद्धव ठाकरेंसोबत पण..,धैर्यशील मानेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेकडून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. मात्र आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आढळराव पाटील यांनी त्यांचे सोशल मीडियावर अभिनंदन केले होते. यावरून शिवसेना पक्षश्रेष्ठींनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. मात्र अनावधानाने हा प्रकार झाल्याचे म्हणत शिवसेनेने ही कारवाई मागे घेतली. तेव्हापासूनचं आढळराव पाटील नाराज होते. या सर्व घटनेनंतर आढळराव पाटील शिवसेनेत थांबणार की शिंदे गटात सामील होणार याविषयी चर्चा रंगल्या. अखेर आढळराव पाटलांनीही आता शिंदे गटाचा हात पकडला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : …तर पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदाराही आले नसते, रामदास कदमांचा दावा

यानंतर आढळराव पाटील यांनी शिरुर लोकसभा मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची मंगळवारी 19 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शिवनेरी निवास, लांडेवाडी, तालुका – आंबेगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख जुन्नर विधानसभेचे आमदार शरद सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थित तातडीने बैठक आयोजित केल्याचा मेसेज कार्यकर्त्यांना केला होता. यानंतर आज त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मनातील खदखद व्यक्त केली.

हेही वाचा : शिंदे गटातील ३ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश, नाईकांचा मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का

आढळराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदेंना आमच्या अडचणी ठाऊक होत्या, निवडून येताना काय समस्यांचा सामना करावा लागतो याची जाणीव त्यांना आहे. गेल्या 15 वर्षे या जिल्ह्यात मी खासदार राहिलो, शिवसेना जिल्ह्यात, गावखेड्यात नेत वाढवली. शिवसैनिकांसाठी मी जिल्ह्यात भांडलो. मात्र एका पोस्टमुळे माझी पक्षातून हकालपट्टी केली, अशा भावनिक शब्दात त्यांनी आपल्या दु:खांना वाट मोकळी करून दिली. तसेच दुसऱ्या दिवशी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला, त्यावेळी मला त्यांनी परत येण्याचे आवाहन केल्याचेही आढळराव पाटलांनी सांगितले.


राऊतांमुळे खासदारांचही बंड; बंडाच्या केंद्रस्थानी नाशिकच


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -