घरताज्या घडामोडीजितेन गजारिया प्रकरणात नीलम गोऱ्हे म्हणाल्या, जितेन हे एक राजकारणातील हस्तक आणि...

जितेन गजारिया प्रकरणात नीलम गोऱ्हे म्हणाल्या, जितेन हे एक राजकारणातील हस्तक आणि प्याद

Subscribe

भाजप महाराष्ट्र IT सेल प्रभारी जितेन गजारियाच्या वादग्रस्त ट्विट केलं राज्यात राजकारण तापले आहे. याबाबत शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आज जितेन गजारिया याच्या ट्विटमध्ये रश्मी उद्धव ठाकरे यांच्या निमित्ताने काही टिका, उपहास आणि मानहानीकारकरित्या तुच्छतेचे टुकार ताशेरे मारण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रेवडी उडवणे हा त्यामागील हेतू होताच. परंतु सुसंकृत, सुविद्य अशा रश्मी ठाकरे यांचीही कोणतेही साम्य नसलेली तुलना करून मानहानीकारकरित्या उल्लेख केला होता. आज मुंबई पोलिसांच्या चौकशीत जितेनने माफी मागितली आहे तर पुणे पोलिसांनी सायबर क्राईम तर्फे गुन्हा दाखल केला आहे. जितेन हे एक राजकारणातील हस्तक आणि प्यादे असून त्याने त्याच्या राजा आणि वजिराच्या भूमिकेनुसार हे ट्विट केले असावे. कारण भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी जितेनच्या ट्विटचे समर्थन केले आहे.

पुढे गोऱ्हे म्हणाल्या की, ‘भाजपमध्ये अनेक प्रकारे शिक्षण प्रशिक्षण केले जाते. परंतु त्याचवेळी स्वत:च्या केंद्रातील अपयशावरुन लक्ष उडवायला अशा खेळ्या करणे हे त्यांचे राजकारणच आहे. उत्तरप्रदेश, गोवा , येथील वक्तव्ये महिला बलात्काराच्या घटना, बुल्लीबाई बदनामी कांड यावर मौन पाळायचे आणि अन्य ठिकाणच्या घटनांवर राजकीय भांडवल, शेरेबाजी करायची हे केले जाते. कारण जुमलेबाजी कशी प्रभावी करायची, यांचे साम, दाम, दंड, भेद यांची कपटनिती आहे. ज्यांना ज्यांना खरेच सायबर क्राईममधील सुरक्षिततेसाठी काही करायचे असेल त्यांनी केंद्राच्या ६६ अ कायद्याला परिणामकारक करावे तथा महाराष्ट्राच्या शक्ती कायद्याच्या धर्तीवर केंद्राने सायबर क्राईमचा समावेश करण्यास लक्ष घालावे. अन्यथा महिलांच्या प्रश्नावर मगरीचे अश्रु तरी ढाळु नयेत.’

- Advertisement -

हेही वाचा – रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणारा भाजपचा गजारिया पोलिसांच्या ताब्यात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -