भिकाऱ्यासारखे वणवण का भटकतायत, संधी अजून गेलेली नाही, संजय राऊतांचं बंडखोरांना आवाहन

काँग्रेस आणि राष्ट्रवादी मजबुतीने आमच्या पाठिशी ठाम उभे आहेत. त्यामुळे आजची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा ठरेल, असही राऊत म्हणाले

shivsena mla sanjay raut on eknath shinde shivsena mla security maharashtra politics

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे राजकीय पेच आणखीच वाढत आहे. या आमदारांनी सुरत मार्गे गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये आपल बस्तान मांडले आहे. अशाच बंडखोर शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय आकसापोटी आपल्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेतल्याचे आरोप केले आहेत. यामुळे आपल्या कुटुंबियांच संरक्षण कमी केल्याने त्यांच्या कुटुंबियांना धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फक्त आमदारांना महाराष्ट्रात सुरक्षा पुरवली जाते. पण ते आता राज्याबाहेर असल्याने त्यांना सुरक्षा नसते. सरकारतर्फे केवळ आमदारांनाच सुरक्षा असते. त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच आमदारांनी बंडखोरीसाठी महाराष्ट्रातून केलेल्या पलायनावरही टीका केली आहे.

एकनाथ शिंदेंच्या ट्विटवर राऊत म्हणाले की, घरच्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली. ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. त्यांनी ढुंगणाला पाय लावून पलायन केलं आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी महाराष्ट्रातून त्यांचे सुरक्षा रक्षक नेले आहेत. त्यांना ही सुरक्षा आमदार म्हणून दिली आहे. कुटुंबाला सुरक्षा नसते. आमदाराला सुरक्षा असते. महाराष्ट्रात या.. आपल्या राज्यात या..असं वणवण भिकाऱ्यासारखं का भटकतायत. असं करू नका. यामुळे राज्याची इज्जत धुळीला मिळतेय…. तुम्ही शिवसेनेचे आमदार आहात ना… स्वतःला वाघ मानता ना.. मग बकरीसासरखं बें बें करू नका. सोडून द्या विषय. अजूनही संधी गेली नाही… असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. पैशाच्या जोरावर किंवा कोणी तरी एखादी महाशक्ती म्हणवणारा पक्ष कोणाच्या पाठीशी आहे म्हणून कोणाला अशाप्रकारे हायजॅक करता येणार नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे. बाळासाहेब ठाकरे सुद्धा सांगायचे मी शिवसेना प्रमुख आहे कारण माझ्या पाठीशी हजारो शिवसैनिक आहेत. आज हे हजारो शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत. कोणाला पैसा, दहशतवाद, आणि अफवांच्या बळावर विकत घेऊ शकणार नाही. पक्ष एक संघ, मजबूत आणि एकसंघ आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांची रिघ लागली . आता माझ्याकडं सांगली आणि मिरजेहून शिवसैनिक आलेत. हे फक्त आदेशाची वाट पाहत आहेत. हे सोप्पे नाही, हे कोणत्या पक्षात घडत नाही. ही पक्षाची मोठी आणि खरी ताकद आहे. शिवाय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मजबुतीने आमच्या पाठिशी ठाम उभे आहेत. त्यामुळे आजची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा ठरेल, असही राऊत म्हणाले.


गुजरात दंगलीला नेहमीच राजकीय नजरेतून पाहिले गेले, मी मोदींचे दु:ख जवळून पाहिले – अमित शाह