घरमहाराष्ट्रMaha Politics : ज्या कार्यकर्त्याला आमदारकी दिली, त्यानेच आता पाठ फिरवली; ठाकरेंना...

Maha Politics : ज्या कार्यकर्त्याला आमदारकी दिली, त्यानेच आता पाठ फिरवली; ठाकरेंना आणखी एक धक्का

Subscribe

2022 च्या विधान परिषदेच्या निवडणुकीत नंदुरबारमधील आमश्या पाडवी यांना ठाकरेंनी ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात जाऊन आमदारकी दिली होती, तेच पाडवी आज (ता. 17 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात लोकसभेचे मतदान होणार आहे. एकीकडे प्रचाराला सुरुवात झालेली असताना दुसरीकडे मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबताना दिसत नाहीये. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि जवळचे सहकारी जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश करून काही दिवस उलटत असतानाच आता पुन्हा एकदा शिंदे गट ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. 2022 च्या विधान परिषदेच्या निवडणुकीत नंदुरबारमधील आमश्या पाडवी यांना ठाकरेंनी ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात जाऊन आमदारकी दिली होती, तेच पाडवी आज (ता. 17 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (Thackeray Group Legislative Council MLA Amshya Padvi will join Shiv Sena after leaving Uddhav Thackeray support)

- Advertisement -

हेही वाचा… Sanjay Raut : गॅरंटी तेच नाही तर आम्हालाही देता येते, राऊतांच्या भाजपाला टोला

लोकसभेची उमेदवारी मिळत नसल्याने आमदार आमश्या पाडवी हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पण आता ही चर्चा खरी ठरत असून आमश्या पाडवी हे शिंदेंच्या शिवसेनेत आजच प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या व्यक्तीसाठी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बड्या नेत्यांची नाराजी ओढवून घेतली, त्याला विधान परिषद आमदाराकीचे बक्षीस दिले, तोच आमदार आता ठाकरेंची साथ सोडणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातून आमश्या पाडवी साथ सोडत असल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. या आमदारास विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जीवाचे रान केले होते, ज्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisement -

आमदार आमश्या पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी मोठे योगदान दिले होते. पाडवी यांचा गेल्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या के. सी. पाडवी यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना दोन्ही वेळेस पराभव पत्करावा लागला. 2019 मध्ये झालेली निवडणुकीमध्ये पाडवी यांनी 80 हजार मते घेतली होती. पण ठाकरे गटाकडे आदिवासी चेहरा नसल्याने आणि आदिवासी समाजाला आकर्षित करण्यासाठी 2022 च्या विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी अनेकांच्या विरोधात जात नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आमश्या पाडवी यांना संधी दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -