घरताज्या घडामोडीशिंदे-फडणवीसांच्या दबावानंतर माझ्यावर गुन्हा दाखल - संजय राऊत

शिंदे-फडणवीसांच्या दबावानंतर माझ्यावर गुन्हा दाखल – संजय राऊत

Subscribe

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमध्ये संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमध्ये संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. ‘बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनाने पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील. असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला. मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल’, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis)

राऊतांच्या ट्वीटमध्ये काय?

- Advertisement -

नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून राज्यातील मुख्यमंत्र एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हल्लाबोल केला आहे. “नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे “गठन” बेकायदेशीर ठरले आहे. व्हिपपासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्यापर्यंत सगळेच घटना विरोधी ठरवले आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

“सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनाने पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील. असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला. मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल”, असेही संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले.

- Advertisement -

नेमके काय म्हणाले संजय राऊत?

सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकच्या शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. यावेळी ते म्हणाले होते की, सरकार बेकायदेशीर असून पुढील तीन महिन्यात सरकार कोसळणार आहे. त्यामुळे पोलिसांसह इतर अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर सरकारच्या आदेशाचे पालन करु नका. बेकायदेशीर आदेशाचे पालन केले तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील, असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – अकोल्यानंतर नगरमध्ये भडका; शेवगावात दगडफेक, जाळपोळ; 4 पोलीस जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -