Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Maharashtra Politics : उदय सामंत यांना ठाकरे गटाची चिंता, म्हणाले...

Maharashtra Politics : उदय सामंत यांना ठाकरे गटाची चिंता, म्हणाले…

Subscribe

ठाकरे गटाला संपविण्याचा कट संजय राऊत रचत असल्याचा आरोप उदय सामंत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. तर दोन दिवसांपासून ठाकरे गटातील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील उदय सामंत हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. त्यामुळे उदय सामंत यांना ठाकरे गटाबाबत इतकी काळजी का वाटत आहे? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदललेली आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे या बंडखोरीनंततर कायमच शिवसेनेवर (शिंदे गट) टीका करत आहेत. त्यांच्या या टीकेली शिवसेनेच्या प्रत्येक व्यक्तीकडून प्रतित्युत्तर देण्यात येत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या टीकेमध्ये ठाकरे विषयीची काळजी दिसून येत आहे. ठाकरे गटाला संपविण्याचा कट संजय राऊत रचत असल्याचा आरोप सामंत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. तर दोन दिवसांपासून ठाकरे गटातील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील उदय सामंत हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. त्यामुळे उदय सामंत यांना ठाकरे गटाबाबत इतकी काळजी का वाटत आहे? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. (Uday Samant worries about Thackeray group) उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. तसेच महाविकास आघाडीवर टीका देखील केली.

हेही वाचा – बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत म्हणाले की, महाविकास आघाडीत असताना आम्ही ठाकरे यांना वारंवार सांगत होतो कि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आघाडी करून संजय राऊत हे शरद पवारांसोबत शिवसेना संपविण्याचा कट करीत आहेत. राऊत हे बाळासाहेबांशी नाही तर पवारांशी एकनिष्ठ आहेत. त्यामळे भाजप सोबत युती करावी जी नैसर्गिक युती आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आघाडी करणे हेच शिवसेनेचे नुकसान होण्यास कारणीभूत आहे, असा आरोप यावेळी सामंत यांच्याकडून करण्यात आला आहे. आज उद्धव ठाकरे यांची जी बिकट अवस्था झाली आहे त्याला संजय राऊत जबाबदार असून कर्नाटक निवडणूक काँग्रेसने जिंकली ही ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा आहे, असेही यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले.

सत्ताधाऱ्यांवर टीका करणे हा विरोधकांचा एककलमी कार्यक्रम
कर्नाटक निवडणूक काँग्रेसने जिंकल्यामुळे आता महाराष्ट्रात मविआचे नेतृत्व नाना पटोले करणार आहेत का? हे देखील जनतेला कळले पाहिजे. हा विजय तिथले काँगेस नेते डी. के. शिवकुमार, सिद्धरमय्या यांचा आहे. आता इथल्या काही लोकांना स्वप्न पडायला लागले की महाराष्ट्रतही महाविकास आघाडीचे सरकार येणार. जे काल मविआच्या बैठकीला जमले होते, त्यांना एक आठवण करून देतो की, 2018 ला राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आली आणि त्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीत सर्व 25 जागा भाजपने जिंकल्या. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार असताना 29 पैकी 28 जागा भाजपने जिंकल्या. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहील असे नेतृत्व समोर आहे अशी शक्यता देशात नाही, असे सांगून मोदींवर, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करणे हा एककलमी कार्यक्रम विरोधकांचा सुरू आहे, अशी टीका देखील यावेळी उदय सामंत यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

ठाकरे गटाला दाखवली जागा
राज्यात पहिल्या क्रमांकावर भाजप, दोन क्रमांकावर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेस, चार क्रमांकावर काँग्रेस आणि पाच वर उबाठा आहे. ही आकडेवारी माझी नाही तर ग्रामपंचायत निवडणूक, कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकांमधून स्पष्ट झालयं, असे म्हणत उदय सामंत यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला.

संजय राऊत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आग लावण्याचे काम करतात
घटनाबाह्य सरकार म्हणून रोज सकाळी 9.30 चा भोंगा उद्योग सुरु असतो. संजय राऊत आपल्या पत्रकार परिषदेतून रोज आग लावण्याचे काम करतात. हे म्हणतात घटनाबाह्य सरकार आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी बंड करावे, पोलिसांनी बंड करा, हि बाब निषेधार्थ आहेच. पण आतंकवादाला निमंत्रण दिल्यासारखे आहे. याचा अर्थ तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दंगली घडवणार आहात. उद्या जर पोलिसांनी बंड केले आणि महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार फक्त संजय राऊत असतील, असे म्हणत सामंतांनी यावेळी राऊतांवर निशाणा साधला. आज दहशतवादी संघटना याकडे लक्ष लावून असतील. पोलिसांना भडकवण्याचे पाप यांनी केले. देशात असे कारस्थान जो करेल त्यासाठी त्याला कायदा सोडणार नाही. ज्यांनी दंगल, लोकांमध्ये गैरसमज पसरवून, मोदींचे फोटो टाकून मते मागितली आणि राष्ट्रवादीशी आघाडी केली त्यांनी आम्हाला नैतिकता सांगू नये, असेही यावेळी सामंत म्हणाले.

- Advertisment -