घरमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस सरकार कोसळण्यावरून उद्धव ठाकरेंचे मोठे विधान

शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्यावरून उद्धव ठाकरेंचे मोठे विधान

Subscribe

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार आहे, म्हणून ते या प्रकल्पाच्याबाबतीत पावलं मागे नाही घेत आहेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

रत्नागिरीतील बारसू येथे उभारण्यात येणाऱ्या रिफायनरी प्रकल्पावरून कोकणात वातावरण तापलेले आहे. रिफायनरीचा प्रकल्प बारसूमध्ये करण्यात येऊ नये यासाठी बारसू सोलगावातील ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलकांची आज (ता. 07 मे) उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यानंतर त्यांनी बारसूतील कातळशिल्पाला देखील भेट दिली. तसेच, त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार आहे, म्हणून ते या प्रकल्पाच्याबाबतीत पावलं मागे नाही घेत आहेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा – बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला विचारले प्रश्न, म्हणाले…

- Advertisement -

यावेळी प्रसार माध्यमांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न केला की, बारसू प्रकल्पाला एवढा विरोध असूनही शिंदे सरकार मागे हटायला तयार नाहीये. उलट एक पाऊल पुढेच टाकत आहे, असा सवाल केला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्यातील शिंदे सरकार बहुतेक कोसळेल. पावलं मागे नाही घेतले तरी त्यांच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत,” असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

विनाशकारी प्रकल्प गुजरातला न्या..
माझ्याकडे कागदपत्रांचा गठ्ठा आला होता. ग्रामपंचायतीचे ठराव आहेत असे मला त्यावेळी सांगण्यात आले होते, अशी माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून यावेळी देण्यात आली. तसेच माझ्याच काळातील एअर बस आणि वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला का दिले? हा प्रकल्प गुजरातला न्या. वेदांत फॉक्सकॉन इतर प्रकल्प महाराष्ट्राला द्या. गिफ्ट सिटी महाराष्ट्राला द्या. चांगल्या गोष्टी गुजरात आणि दिल्लीला दिल्या. इतर प्रकल्प आम्हाला दिल्या आहेत, असेही यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

प्रकल्प इथे झाला तर फायदा, गद्दारांनी दिली होती माहिती
मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जे आता सुपारी घेऊन फिरत आहेत, त्या गद्दारांनी मला सांगितले की बारसूमध्ये हा प्रकल्प झाला तर तिथल्या लोकांचा याला विरोध नाही. बरीचशी जमीन ही निर्मनुष्य आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही किंवा कमी होईल. हा प्रकल्प तिथे आला तर एक चांगला प्रकल्प आपल्या राज्याला मिळेल. त्यामुळे बारसूच्या जागेसंदर्भातील पत्र केंद्राला पाठवले, अशी माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -