घरमहाराष्ट्रपुणे...तर 20पर्यंतही आमदारांची संख्या पोहोचली नसती, गिरीश महाजनांनी आदित्य ठाकरेंना सुनावले

…तर 20पर्यंतही आमदारांची संख्या पोहोचली नसती, गिरीश महाजनांनी आदित्य ठाकरेंना सुनावले

Subscribe

पुणे (वार्ताहर) : शिवसेना आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे हे सातत्याने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. त्याला भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मोदीचे फोटो लावून तसेच त्यांना भाषणाला बोलावल्याने आपण निवडून आला आहात. म्हणूनच शिवसेनेच्या आमदारांची संख्या 55पर्यंत गेली. स्वबळावर लढला असता तर 20पर्यत देखील आमदाराची संख्या पोहोचली नसती, असे त्यांनी सुनावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूडमध्ये माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सायकल रॅलीच आयोजन केले होते. या रॅलीच उद्घाटन उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेना व आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

- Advertisement -

शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे राज्यभराचा दौरा करत आहेत. त्यांनी बंडखोर आमदारांचा कायम ‘गद्दार’ असा उल्लेख करत टीका केली आहे. शुक्रवारी ते कोकणदौऱ्यावर होते. रत्नागिरीच्या चिपळूण शहरामध्ये आदित्य ठाकरे यांनी, गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी या 40जणांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला समोरे जाण्याचे आव्हान दिले.

याचा समाचार घेताना गिरीश महाजन म्हणाले की, तुम्ही अडीच वर्षापूर्वी आमच्यासोबत विधानसभेला लढला. नंतर आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेलात. त्यावेळेस आपल्याला हे का सुचले नाही? आपण मोदीचे फोटो लावले तसेच. त्यांना भाषणाला बोलावले. भाजपच्या अन्य नेत्यांनीही भाषण केले. त्यामुळेच तुम्ही निवडून आला आहात. स्वबळावर लढला असता तर 20 आमदारही जिंकले नसते, असे ते म्हणाले.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीतही यामुळेच आपले 18 खासदार निवडून आले. अन्यथा 2 खासदार देखील जिंकले नसते. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत आपले कौशल्य दाखवा. मग आपल्याला समजेल आपण कुठे आहोत, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर टीका केली.

आमचे सरकार येण्यापूर्वीच गुजरातमध्ये जाण्याची कंपनीची मानसिकता
वेदांता ग्रुपचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने विरोधक टीका करीत आहे. त्याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, आमचे सरकार येऊन दोन महिने होत आले आहेत. पण आमचे सरकार येण्याअगोदरच हा प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जाण्याची मानसिकता कंपनीची झाली होती. तसेच वेदांता ग्रुपकडून 5 जानेवारी रोजी एक पत्र राज्य सरकारला पाठविण्यात आल होते. पण सहा महिने होऊन देखील राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्या वेळेच्या राज्यकर्त्यांना समजयाला पाहिजे की, आपण काय केले? तुम्ही वायनरीकरिता बैठका घेता, दारूवरील टॅक्स कमी करण्यासाठी बैठका घेता, पण लाखो तरुणांना रोजगार देणाऱ्या प्रकल्पासाठी अर्धा तासाची बैठक देखील घेतली गेली नाही किंवा तुम्हाला वेळ मिळाला नाही, असेही त्यांनी विरोधकांना सुनावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -