घरपालघरVirar Tragedy : निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळून तीन मजूर महिलांचा मृत्यू

Virar Tragedy : निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळून तीन मजूर महिलांचा मृत्यू

Subscribe

वसई : इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच भिंत अंगावर कोसळून त्याखाली पाच महिला दबल्याची घटना विरारमध्ये (Virar Tragedy) समोर आली आहे. पाचपैकी तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

ही घटना विरार पूर्वेकडील (Virar East) मनवेलपाडा रोडवर (Manvelpada Road) एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे आधी असलेली रवीकिरण नावाची इमारत धोकादायक झाल्याने त्याजागी ही बहुमजली इमारत बांधण्यात येत आहे. त्यासाठी जमिनीखाली खोल पाया खणून भिंत टाकण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी पंधराहून अधिक मजूर काम करतात.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्रच अव्वल, फडणवीसांचा मोठा दावा

मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दहा फूट उंच भिंत कोसळली. तिथेच काम करत असलेल्या पाच मजूर महिला या भिंतीच्या ढिगार्‍याखाली दबल्या गेल्याने खळबळ उडाली होती. याघटनेची माहिती वसई -विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. ढिगार्‍याखाली दबलेल्या पाचही महिलांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळले. या घटनेत दोन महिला मजूर जखमी झाल्या असून त्यातील एका महिलेची प्रकृत्ती चिंताजनक आहे. याठिकाणी सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली न गेल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

ठाण्यातही घडली होती अशीच दुर्घटना
ठाणे शहरातील नौपाडा, भास्कर कॉलनी येथे साधारणपणे 20 दिवसांपूर्वी इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. त्यात दोन मुलांसह आई जखमी झाले होते. 15 मे रोजी अमर टॉवर या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून प्रथमेश सूर्यवंशी (28) त्याची आई विजया (54) आणि भाऊ अथर्व (14) असे तिघे मायलेक जखमी झाले होते. तर, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वरच्या मजल्यावर अडकलेल्या शिशिर पित्रे (60) यांना सुखरूप बाहेर काढले होते.

हेही वाचा – गर्भवती माता आणि बालकांसाठी ‘किलबिलाट ॲम्ब्युलन्स’ नाविन्यपूर्ण उपक्रम : देवेंद्र फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -