घरCORONA UPDATECorona: फेसबुकवरून महिलेला धमक्यांचे कॉल्स; पोलिसांत गुन्हा दाखल

Corona: फेसबुकवरून महिलेला धमक्यांचे कॉल्स; पोलिसांत गुन्हा दाखल

Subscribe

मुंबईतील झोपडपट्टी परिसरात सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले आहेत, असे चित्र वारंवार व्हिडिओ किंवा वृत्तवाहिन्यांमधून पाहालया मिळते. मात्र या कारणासाठी एका ३३ वर्षीय महिलेला चक्क फोन कॉलवरून धमकावण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लघु उद्योग करणाऱ्या या महिलेला फेसबुकच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अश्लाघ्य भाषेत सोशल डिस्टन्सिंगच्या कारणाने धमकावण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे. त्या महिलेनेही त्यांच्या वक्तव्यासाठी प्रत्युत्तर दिले असून हा विषय सोशल मीडियावर प्रकाशझोतात आणला आहे.

हेही वाचा- Coronavirus : रोजगार बुडाल्यास ‘ही’ सरकारी बँक देणार ५ हजार रुपये कर्ज

- Advertisement -

२४ एप्रिल रोजी त्या महिलेला पाच जणांचे धमकावणारे फोन आले होते. त्यांनी अतिशय वाईट शब्दात भाष्य केल्याचे सांगितले जात आहे. हा सर्व प्रकार फेसबुकसारख्या सोशल मीडियावर घडत असून या महिलेने घडलेल्या प्रकरणी तिची माफी मागतली जावी तसेच ते सर्व कमेन्ट डिलीट केले जावे, अशी मागणी केली आहे. त्या आरोपीने महिलेच्या कंपनी वेबसाइटवर आणि लिंक्डइनवर बदनामी करणारे कमेंट लिहीले होते. तसेच आरोपीने त्या उद्योजक महिलेच्या परदेशातील बिझनेस पार्टनरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होते. त्या आरोपीने महिलेच्या कंपनी वेबसाइटवर आणि लिंक्डइनवर बदनामी करणारे कमेंट लिहीले होते.

सोशल मीडियाचा वापर हा धमक्या, छळ आणि बदनामी करण्यासाठी केले जाणे हे अयोग्य आहे. हे माध्यम आपली मतं मांडण्यासाठी आहेत, अशी प्रतिक्रिया त्या महिलेने दिली. या प्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आली असून कलम ५०९, कलम ५०४, कलम ५०६, कलम ५०० आणि कलम ३० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -