घरराजकारणराज्यपालांना कोंडीत पकडू नका, भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

राज्यपालांना कोंडीत पकडू नका, भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

Subscribe

मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे. शिवरायांच्या जन्मस्थानी नमन करण्यासाठी ते वयाच्या 79व्या वर्षी शिवनेरी किल्ला पायी चढून गेले. तथपि, पदवीदान समारंभात जे वक्तव्य झाले, त्याचे कोणी समर्थन करत नाही. परंतु, केवळ एखाद्या विधानावरून त्यांना कोंडीत पकडू नये, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे बोलताना केले.

वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच आणखी एक वादग्रस्त विधान केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत केली. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आहेत. तुमचे हीरो तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. डॉ. आंबेडकरांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच सध्याचे आदर्श आहेत, असे विधान राज्यपाल कोश्यारींनी केले होते. त्यावर विरोधी पक्ष आक्रमक झाला असून विरोधी पक्षाने राज्यपालांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. तर, भाजपाकडून मात्र सारवासारव केली जात आहे.

- Advertisement -

भाजपाचे 18 कोटी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काम करतात. त्यामुळे शिवरायांचे इतिहासातील महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना बावनकुळे यांनी राज्यपालांची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला.

आदित्य ठाकरेंवर टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत लाजीरवाण्या शब्दात टीका केली. त्याची संपूर्ण महाराष्ट्राने निंदा केली. पण आदित्य ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हिंदुत्व, शिवाजी महाराज, सावरकर या विषयांची काळजी असती तर अशी गळाभेट घेतली नसती, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करणार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे- फडणवीस सरकार पडेल, असे भाकित केले आहे. याविषयी विचारले असता, सरकार मजबूत आहे. ते कार्यकाळ पूर्ण करेल. विरोधी पक्षातील 20 ते 25 आमदारांचे या सरकारला छुपे समर्थन आहे. सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगितले तर, सध्याच्या 164 पेक्षा खूप जास्त आमदारांचे समर्थन दिसेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात असताना काँग्रेसच्या 500 सक्रिय आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आमच्याबद्दल बोलण्यापेक्षा आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीत या तीन पक्षांना उमेदवार तरी मिळतात का पहावे, अशी कोपरखळी बावनकुळे यांनी मारली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -