सरकार पाडण्यासाठी सुरतला जाऊन कारण ठरली; पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

Sharad pawar on Shinde and Fadnavis  Government

महाराष्ट्र पाठोपाठ आता गोव्यातही भाजप ऑपरेशन लोटस राबवत असल्याचे दिसतेय. गोव्यामधील काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले आहे. यामुळे भाजपकडून लोकशाहीच्या संस्था या उद्वस्त करण्याचे काम सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीये. कर्नाटक , मध्यप्रदेश, महाराष्ट्रानंतरही गोव्यात आता भाजप एक हाती सत्ता काबीज करण्यासाठी रणनीती आखत आहे. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ झालेले आता कमी अस्वस्थ झाले असतील असा टोला शरद पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी मध्यावधी निवडणुका होतील असं वक्तव्य केलं होत यावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले की, मध्यावधी निवडणुका होतील असं कधीच म्हटलं नाही, मी म्हणालो की अडीच वर्षे झाली आता अडीच वर्षे राहीली, आपण आतापासून निवडणुकीला तयार राहिलं पाहिजे असं शरद पवार म्हणाले.(Sharad pawar on Shinde and Fadnavis  Government )

मविआ सरकार पाडण्यासाठी बंडखोरांनी कारणं सुरतला जाऊन ठरली

मविआ सरकार पडल्यासंदर्भात शरद पवारांनी भाष्य केलंय ते म्हणाले की, “सरकार पाडण्यासाठी काही निश्चित कारण नव्हतं कुणी राष्ट्रवादीचे नाव घेतलं तर कोणी हिंदुत्वाचं कारण सांगीतलं यासह काहींनी तर ईडीचे नाव घेतले ही सर्व कारण सुरतला गेल्यानंतर ठरली आहे मात्र त्यापूर्वी कधीही अशी वक्तव्य चर्चा कानावर आली नाही. त्यामुळे त्यांनी जनतेसमोर यावं आणि स्पष्ट करावं त्यांच्याकडे काहीच सक्षम कारण नाही”

नामांतरणापेक्षा मुलभूत सुविधांवर लक्ष देणं गरजेचं- शरद पवार

यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतरण करण्यासंदर्भात शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला यावर बोलताना शरद पवार म्हमाले, हा मविआचा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता हा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला. प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आम्हाला समजलं पण मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर त्यावर काही बोलणं योग्य नसतं पण यापूर्वी मूलभूत समस्यांकडे अधिक लक्ष दिलं असतं तर चांगलं झालं असतं अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.

 


हे हि वाचा – पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्याला मिळाले, शरद पवारांची खोचक टीका