घरराजकारण"२०२४ पर्यंत महाविकास आघाडी खिळखिळी करण्याचे भाजपचे कारस्थान", संजय राऊतांचा आरोप

“२०२४ पर्यंत महाविकास आघाडी खिळखिळी करण्याचे भाजपचे कारस्थान”, संजय राऊतांचा आरोप

Subscribe

मुंबई | “२०२४ पर्यंत महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) खिळखिळी करण्याचे भाजपचे कारस्थान आहे”, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. राष्टवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी (Ajit Pawar)या संदर्भात येणाऱ्या सर्व बातम्या अफवा आणि वावड्या आहेत. यात काही तथ्य नाही, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची मजबूत आघाडी आहे. यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे’, असा ही टोला संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सुचक विधान संजय राऊतांनी यावेळी केली.

संजय राऊत म्हणाले, “तिन्ही घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांची आघाडी मजबूत आहे. या मजबूत आघाडीची भिती भाजपला वाटते. यामुळे भाजपच्या पायाखालीची वाळू सरकू लागली आहे. म्हणून २०२४ पर्यंत आघाडी खिळखिळी करण्याचे त्यांचे कारस्थान नक्की आहे. शिवसेनेतून काही आमदार फोडले म्हणून शिवसेना फुटली का?  २०-२५ आमदार जाणे म्हणजे पक्ष खिळखिळी होणे असे होत नाही. नक्कीच मी म्हणतोय की, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्ष फुटला का? आजही हा पक्ष शरद पवार यांच्या नावाशी बांधलेला आहे. आजही शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या नावाशी बांधलेली आहे. बातम्या वगैरे येतात ४० फुटले, ५० फुटले, १०० फुटले, अशा प्रकारच्या बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही. माझी पक्की माहिती आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. अजित दादांविषयी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसविषयी माझ्या माहितीप्रमाणे त्या खोट्या आहेत. भाजप या अफवा आणि वावड्या उठवित आहेत. लोकांमध्ये गोंधळ निर्माण करत आहेत. आपआपासात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तसे काहीही होणार नाही. या बातम्यांमुळे सगळ्यात जास्त पोटात गोळा आला असेल तर ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या जो काही गट आहे. त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. पण, अजित पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहे. प्रमुख नेते आहेत. आणि त्यांचे राजकीय भविष्य हे महाविकास आघाडीतूनच पुढे शिकरावर जाणार आहे. त्यांच्या विषय यासगळ्या बातम्या आणि रेवड्या उठविल्या जात आहेत. याचा महाविकास आघाडीच्या ऐकीवर आणि मजबुतीवर काही परिणाम होणार नाही. आज सकाळी आम्ही सगळे ऐकमेकांशी बोललो आहोत. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर प्रमुख नेते सगळ्यांनी ऐकमेकांशी बोलून माहिती घेतली आहे. हे जे काही तुम्ही आकडे सांगत आहात. हे कुठून येतात हे मला काही माहिती नाही. आणि एकाच वृत्तपत्राला हे आकडे कसे मिळतात. पण, येऊ द्या काही हरकत नाही. लोकांचे मनोरंजन होत आहे.”

- Advertisement -

‘मविआ’च्या सभेचा भाजपला धसका

भाजप मिशन लोटस राबविण्याचा प्रयत्न करत आहे. कुठे तरी २०० पेक्षा अधिक जागा आणि ४५ पेक्षा अधिक जागा मिळविण्यासाठी हा प्रयत्न करत आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊतांना केल्यावर ते म्हणाले, “४५ प्लस नाही, लोकसभेच्या १० मिळविल्यात तरी पुरे आहे. या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जे मजबूत घठबंधन जे आहे. ते किमान विधानसभेच्या १८५ जागा जिंकणार”, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत पुढे म्हणाले, “मग कितीही फोडाफोडी करा. तुम्ही आमदार फोडाल किंवा तुम्ही खासदार फोडाल. पण, संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आमच्या पाठिशी आहे. हे चित्र आपण पाहाताय. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा असेल किंवा शिवसेनेच्या स्वतंत्र सभा असतील. लोकांची चिड आणि संताप दिसतोय. आणि यांचा धसका भाजपने घेतला असेल. त्यातून या सगळ्या अफवा, वावड्या, रेवड्या उठविल्या जात आहेत. तर उडवू द्या.”

- Advertisement -

भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये त्यांच्या लोकांना टाकावे लागेल

महाविकास आघाडीचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केले की, महाराष्ट्रात मिशन लोटस हे राबविले जाऊ शकते. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी देखील सांगितले की, आमच्या पक्षामध्ये हा भरतीचा महिना आहे. या सर्वांचा संबंध कुठे तरी लावला जाऊ शकतो का?, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “बुहतेक त्यांची भरती ही बिन पगारी असेल. अलिकडे कॉन्ट्रॅक्ट लेबर यांची भरती फार होते. आणि जर कोणी कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून घेणार असतील. तर त्यांनी घ्यावे ना. त्यांची वाशिंग मशीन परत दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. आता सगळ्या भाजपच्या लोकांना त्यांच्या मशीनमध्ये टाकावे लागेल.

मुख्यमंत्र्यांसह १६ आमदार अपात्र ठरतील

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाविरोधात येण्याची शक्यता आहे. संजय राऊत म्हणाले, “मला खात्री आहे. मुख्यमंत्र्यांसह १६ आमदार अपात्र ठरतील. यांची मला खात्री आहे. हा देश संविधान कायदा कानून आणि नियम यानुसार चालतो असे मी माणतो. भले, केंद्रातील काही लोक सत्ताधारी यंत्रणावर दबाव आणून त्यांना हवे तसे निकाल घते असतील. अजूनही देशाच्या न्याय व्यवस्थेत राम शास्त्री आहेत. म्हणून आम्हाला खात्री आहे. निकाल आणि न्याय यात फरक आहे. आणि आम्हाला न्याय मिळेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी लवकरच भेटणार

के. सी. वेण्णगोपाल हे मातोश्रीवर आले होते. या भेटीदरम्यान काय महत्वाची चर्चा झाली, यावर संजय राऊत म्हणाले, “के. सी. वेण्णगोपाल हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. महासचिव आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांचे विशेष दूत म्हणून ते मातोश्रीवर आले होते. त्यांचे महत्वाचे काही राजकीय निरोप होते. त्यासंदर्भात त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. दोघांमध्ये चांगल्या वातावरणात चर्चा झाली. त्यात काही निकाल घेतले गेले. भविष्यातील काही घडामोडीसंदर्भात आणि पुन्हा एकदा राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे भेटतील. अशा प्रकारचा एक निर्णय झाला आहे,” अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

अजित पवार यांच्याविषयी वावड्या उठवू नका.

तुम्ही अजित पवार यांच्या संपर्कात आहात का?, असा सवाल पत्रकारांनी संजय राऊतांना केल्यावर ते म्हणाले, “अजित पवार काल आणि परवा हे आमच्या बरोबर होतेच की, यात संपर्कात काय पाहिजे. ते फक्त ४ तास भेटले नाही म्हणून संपर्का तुट तो का? अजित पवार हे पूर्णकाळ नागपुरला होते. आमच्याबरोबर व्यासपीठावर होते. नागपूर ते मुंबई विमान प्रवासात ते आमच्या बरोबर होते. अजित पवार हे उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसले होते. अजित पवार यांनी आमच्या बरोबर भोजन करून चर्चा केली. हास्य विनोद केले. यानंतर उद्धव ठाकरे आणि अजित पवार या दोघांनी खारघरला जो अपघात झाला. त्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींना भेटायला गेले. संपर्क नाही असे कसा म्हणताय. संपर्क असल्याशिवाय या सगळ्या घडामोडी घडतात का?, असा उलट सवाल संजय राऊतांनी पत्रकारांना केला. संजय राऊत म्हणाले, “तुम्ही उगाच अजित पवार यांच्याविषयी वावड्या उठवू नका. अजित पवार हे महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते आहेत. अजित पवार यांची शरद पवार यांच्यावर श्रद्धा आहे. आम्ही सगळे शरद पवार यांना नेता मानतो. शरद पवार हे आमच्या सगळ्याचे मार्गदर्शक आहेत. अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत सेनाहाचे संबंध आहे. त्यामुळे या वावड्या उठविणे बंद करा आणि भविष्यात काय होते ते पाहा”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -