घरक्रीडाहात फ्रॅक्चर असतानाही केली फलंदाजी; भारतीय संघातील 'या' खेळाडूची सर्वत्र चर्चा

हात फ्रॅक्चर असतानाही केली फलंदाजी; भारतीय संघातील ‘या’ खेळाडूची सर्वत्र चर्चा

Subscribe

आजच्या सामन्यात हाताला दुखापत झाली असतानाही हनुमा विहारी पुन्हा क्रीजवर आला आणि डाव्या हाताने फलंदाजी केली. त्याच्या या खेळीमुळे चाहते फार हैराण झाले असून, विहारीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांच्यामध्ये दुसऱ्या दिवशीचा खेळ खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये आंध्र प्रदेशाचा पहिला डाव 397 धावांवर आटोपला. मात्र भारतीय संघातून बाहेर असलेला स्टार खेळाडू हनुमा विहारी याने (Hanuma Vihari) त्याच्या खेळाने चाहत्यांचे मन जिंकूले आहे. (hanuma vihari bats left handed due to fractured on wrist of right hand in ranji trophy)

आजच्या सामन्यात हाताला दुखापत झाली असतानाही हनुमा विहारी पुन्हा क्रीजवर आला आणि डाव्या हाताने फलंदाजी केली. त्याच्या या खेळीमुळे चाहते फार हैराण झाले असून, विहारीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आवेश खान विहारीला गोलंदाजी करत यॉर्कर बॉल टाकतो. अशातच डाव्या हाताने फलंदाजी करत असताना देखील हनुमा विहारी तो बॉल बाऊंड्री पार नेतो.

- Advertisement -

2020-21मध्ये भारतीय संघाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकवून देणारा हनुमा विहारी रणजी सामन्यादरम्यान गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या उजव्या हाताला ही दुखापत झाली असून त्याला प्रचंड वेदनाही होत होत्या. त्यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लगाले. त्यावेळी त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. असे असतानाही आंध्र प्रदेशाच्या संघाला स्कोर करण्याची गरज होती. अशावेळी विहारीने मागचा-पुढचा कोणताच विचार न करता पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला. यावेळी त्याने मैदानावर आल्यानंतर उजव्या हाताने ऐवजी डाव्या हाताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय संघाकडून खेळलेला हनुमा विहारी त्याच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर झाला. गेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये हनुमा विहारीने मुख्य भूमिका बजावली होती. त्याच्या फलंदाजीच्या बळावर भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना ड्रॉ करण्यात यश आले होते.

- Advertisement -

दरम्यान, हनुमा विहारीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 16 सामने खेळले आहेत. यामधील 28 डावामध्ये 33.6 च्या प्रभावी सरासरीने 839 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतकांची खेळी केली आहे.


हेही वाचा – अजिंक्य रहाणे दुसऱ्या देशाच्या संघातून खेळणार; बीसीसीआयला वैतागत घेतला मोठा निर्णय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -