घरट्रेंडिंग#MeToo च्या विळख्यात सोनल वेंगुर्लेकर

#MeToo च्या विळख्यात सोनल वेंगुर्लेकर

Subscribe

अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर हिने देखील कास्टिंग दिग्दर्शक राजा बजाज याच्या लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे.

देशात सुरु असलेल्या मीटू मोहिमेत आला मराठी अभिनेत्री देखील समोर येऊ लागल्या आहेत. झगमगत्या दुनियेमागची काळी बाजू दाखवण्याची चळवळ मीटूच्या माध्यमातून राबवली जात असून आपल्यावर झालेल्या अत्याचारावर आता उघडपणे बोलल जात आहे. अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर हिनेदेखील एका दिग्दर्शकावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे. समा, दाम, दंड, भेद मालिकेतील अभिनेत्री सोनल हिने कास्टिंग दिग्दर्शक राजा बजाज यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने स्वतःवर ओढवलेला प्रसंग सांगितला आहे.

काय म्हणाली सोनल

‘मी १९ वर्षांची असताना हा प्रसंग घडला. मला ऑनलाइन पोर्टलवरून ऑडिशनबाबत समजलं. परंतू माझी ऑडिशन खूप वाईट गेली. ही ऑडिशन कास्टिंग डायरेक्टर राजा बजाज यांनी घेतली होती. मी संवाद उत्तम बोलू शकले नाही कारण मला अभिनयाचा कोणताच अनुभव नव्हता. मला नकार मिळाला. पण मी सुंदर दिसते, त्यामुळे काही गोष्टी शिकले तर मला नक्की पुढे संधी मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी मला त्यांनी सहाय्यक म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याबाबत विचारलं. मी एका चित्रीकरणासाठी त्यांच्यासोबत लोणावळ्याला गेले. मात्र तिथे त्यांनी असभ्य वर्तनास सुरुवात झाली. मला त्यांनी कपड्यांची ट्रायल घेण्यास नकार दिला. मी माझ्या हॉटेल रुममध्ये परतले. तिथे राजा मद्यपान करत होते. माझ्यासाठी सर्वच धक्कादायक होतं. थोड्यावेळानं ते माझ्या रुममध्ये आले. मी तुला तांत्रिक विद्या शिकवणार आहे. ज्यामुळे तू रातोरात प्रसिद्ध होशील. पण त्यासाठी तू विवस्त्र हो आणि माझ्यासमोर बस, माझ्यामागोमाग मंत्रोच्चार कर असं त्यांनी मला सांगितलं. यावर मी ओरडले. त्यांनी माझ्यावर कपडे काढण्यासाठी बळजबरी केली.

- Advertisement -

पोलिसात केली होती तक्रार 

या घटनेनंतर सोनलने २०१२ साली कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात राजा बजाज विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र सोनलनं केलेले आरोप राजा बजाज यांनी फेटाळून लावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -