घरमुंबईएमएमआरडीएचे ५१ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष

एमएमआरडीएचे ५१ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष

Subscribe

गोटेघर येथील ४६ हेक्टर जागेवर हे वृक्षारोपण करण्यात आले. एमएमआरडीएने नियोजन केलेल्या ५१ हजार १५१ झाडांपैकी दहा हजार झाडे ही टिटवाळा आणि कल्याण याठिकाणी लावण्यात आली आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई शहरात सुरू असलेले विविध प्रकल्प पाहता आज ५१ हजार इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणासाठीचा पुढाकार आज घेतला. वन विभाग (ठाणे), महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ तसेच एमएमआरडीए यांच्या एकत्रित पुढाकारातून गोटेघर (शिळ फाटा) येथे हे वृक्षारोपण आयोजित करण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यापासूनच याठिकाणी वृक्षारोपणाला काही टप्प्यात सुरूवात झाली आहे. एमएमआरडीए आयुक्त आर ए राजीव यांनीही यावेळी बकुळाचे रोप लावले.

हेही वाचा – तब्बल ३० तासांनंतर निवडणूक कर्मचारी घरी परतले

- Advertisement -

गोटेघर येथील ४६ हेक्टर जागेवर वृक्षारोपण

‘आम्ही एमएमआरडीए म्हणून पर्यावरणाच्या विषयावर जागरूक आहोत. तसेच मुंबई महानगरात मेगा प्रकल्प राबवतानाच आम्ही वृक्ष छटाईच्या बाबतीतही संवेदनशील आहोत’, असे एमएमआरडीए आयुक्त आर ए राजीव म्हणाले. गोटेघर येथील ४६ हेक्टर जागेवर हे वृक्षारोपण करण्यात आले. एमएमआरडीएने नियोजन केलेल्या ५१ हजार १५१ झाडांपैकी दहा हजार झाडे ही टिटवाळा आणि कल्याण याठिकाणी लावण्यात आली आहेत. येत्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी तज्ञ व्यक्तींच्या देखरेखेअंतर्गत ही रोप असणार आहेत.

हेही वाचा – स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवण्याची मागणी

- Advertisement -

वृक्षरोपणातून ‘या’ झाडांची लागवट करण्यात येणार

एमएमआरडीएने नुकतीच उद्यान विभागाची निर्मिती केली आहे. पर्यावरणीय बदलांचे दिसणारे परिणाम पाहता वृक्षारोपणाच्या माध्यमातून सुरू झालेले काम ही पर्यावरणासाठीचे काम करण्याची संधीच आहे, असे मत अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यांनी मांडले. बकुळ, लिंब, पिंपळ, वड, ताम्हण, अर्जुन, कडंब, जांभुळ यासारख्या झाडांची लागवण येत्या काळातही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -