घरमनोरंजनAmol Palekar : ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना कोरोनाची लागण

Amol Palekar : ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना कोरोनाची लागण

Subscribe

 १० दिवसांपूर्वी अति धुम्रपान केल्यामुळे त्यांना त्रास होत होता. त्यामुळे यापूर्वीही त्यांना याच आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

Amol Palekar Corona Positive :  बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारांसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमोल पालेकर यांना कोरोनाची तीव्र लक्षणे आढळली असून त्यांची कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली आहे.

अमोल पालेकर यांच्यावर योग्य उपचार सुरु असून काळजी करण्याचे काही कारण नसल्याची माहिती अमोल पालेकर यांच्या पत्नी संध्या पालेकर यांनी एका वेबसाईटला दिली आहे.  १० दिवसांपूर्वी अति धुम्रपान केल्यामुळे त्यांना त्रास होत होता. त्यामुळे यापूर्वीही त्यांना याच आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

- Advertisement -

१० दिवसांपूर्वी अमोल पालेकर यांची प्रकृती खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांचा व्हेंटिलेटर आता काढून टाकण्यात आला असून त्यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा स्थिर आणि चांगली आहे. त्यांना आता जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.

अभिनेते अमोल पालेकर हे एक दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमोल यांनी ललित कला शाखेत पदवी घेतली. त्यांनी एक चित्रकार म्हणून करिअरला सुरुवात केली.

- Advertisement -

चित्रकलेची आवड जोपासत त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले, त्यांनी रंगभूमीवर अप्रतिम काम केले आहे. ७० आणि 80 च्या दशकात अमोल पालेकर यांनी हिंदी, मराठी व्यतिरिक्त बंगाली, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. यानंतर अमोलने 1986 नंतर अभिनय सोडून चित्रपट निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

अमोल पालेकर यांनी रजनीगंधा, छोटी सी बात, नरम गरम, गोलमाल, चितचोर, भूमिका, श्रीमान श्रीमती, अनकही, रंग-बिरंगी, घरोंदा, सावन, बातों बातों मे यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. त्यांनी अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांनी मराठीत शांतता कोर्ट चालू आहे. या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.


‘Gangubai Kathiawadi’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; गंगूबाईंची बदनामी केल्याचा कुटुंबीयांचाच आरोप


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -