घरअर्थसंकल्प २०२२कोयनेच पाणी अलिबाग, नवी मुंबईला वळवणार ; जलसंपदा मंत्री जयंत पाटलांची माहिती

कोयनेच पाणी अलिबाग, नवी मुंबईला वळवणार ; जलसंपदा मंत्री जयंत पाटलांची माहिती

Subscribe

कोयना जलविद्युत प्रकल्पातून ६७.५ अब्ज घनफूट पाणी वीज निर्मिती केल्यानंतर कोकणात सोडण्यात येते. त्यापैकी बहुतांश पाणी समुद्रात विनावापर वाहून जाते. हे पाणी अलिबाग आणि रायगड याठिकाणी वापरासाठी उपलब्ध करून देण्याचा मानस सरकारचा असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

कोकण प्रदेशात कोळकेवाडी धरणातून ग्रॕव्हिटी ग्रीडद्वारे सिंचन, बिगर सिंचन पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने सविस्तर अभ्यास करण्यासाठी WAPCOS ला काम देण्यात आले आहे. या अभ्यासाचा सविस्तर अहवाल पूर्ण झाल्यानंतर कोयनेच्या पाण्याचा वापर करण्याचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेणे शक्य असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

येत्या दिवसात दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या माध्यमातून अलिबागसाठी हे पाणी वापरता येईल. कॉरिडॉरच्या माध्यमातून याठिकाणी अधिक विकास तसेच लोकसंख्या वाढ अपेक्षित आहे. तसेच नवी मुंबईलाही या पाण्याचा वापर होईल. हा अभ्यास तातडीने पूर्ण करून आढावा घेण्याच्या सूचना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वेगळा मागासवर्ग आयोग नेमण्यात येईल – अशोक चव्हाण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -