घरक्राइमघरफोडी करणाऱ्या बहिणींच्या त्रिकुटाला अटक; २३ तोळ्यांचे दागिने हस्तगत

घरफोडी करणाऱ्या बहिणींच्या त्रिकुटाला अटक; २३ तोळ्यांचे दागिने हस्तगत

Subscribe

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या तिघी बहिणींना अटक करून त्यांच्याकडून २३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

इमारतीमधील रिकामे घरे हेरून बनावट चावीने घराचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या तीन सख्ख्या बहिणींना कल्याण गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. सारिका सकट, मीना इंगळे, सुजाता सकट अशा या तिघींची नावे असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे. (Three arrested for burglary)

डोंबिवली पूर्व राम नगर परिसरात एका इमारतीमधील बंद घरात चोरी झाली होती. चोरट्यांनी घरात कुणी नसल्याची संधी साधत बनावट चावीने दरवाजा उघडून घरातील २३ तोळे सोन्याचे दागिने चोरले होते. कुटुंबियांनी या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी लागलीच तपासाची सुत्रे हलवली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या तिघी बहिणींना अटक करून त्यांच्याकडून २३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

- Advertisement -

असा लावला छडा

कल्याण गुन्हे शाखेने डोंबिवली स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना या महिला डोंबिवली स्थानकाहून ट्रेनने मुंबईच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. पुढे पोलिसांनी प्रत्येक रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घाटकोपर येथे महिला उतरल्याचे सीसीटिव्हीमध्ये दिसून आलं. या तिन्ही महिला मानखुर्द, कुर्ला परिसरातील असल्याची माहिती खबऱ्यामार्फत कल्याण गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर कल्याण गुन्हे शाखेने या तिन्ही महिलांचा शोध घेणं सुरू केलं. तांत्रिक तपासादरम्यान पोलिसांना या तिन्ही महिला सहकुटुंब जेजुरी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ जेजुरी येथे सापळा रचत या तिन्ही महिलांना जेजुरी येथून अटक केली आहे.

- Advertisement -


पोलिसांनी महिलांकडून चोरीचे २३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार या तिन्ही सराईत चोरट्या असून कुर्ला परिसरामध्ये राहतात. चोरी करण्यासाठी डोंबिवलीमध्ये येत विविध कारणे देत इमारतीमध्ये शिरून बंद घरांमध्ये चोरी करायचे. सध्या पोलीस या तिन्ही महिला आरोपीने डोंबिवलीमध्ये अशाप्रकारे किती ठिकाणी चोरी केली याचा तपास करत आहे. तर त्यांच्याविरोधात मुंबई-ठाणे परिसरातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी दिली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -